शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

मासे आयातीवर बंदी घालण्यापेक्षा फॉर्मेलिनवरच बंदी घाला, अखिल गोवा मासळी विक्रेता संघाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 18:04 IST

फॉर्मेलिनचा वापर होत असल्यामुळे बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या मासळीवर बंदी घालण्याऐवजी या समस्येचे मूळ आहे त्या फॉर्मेलिनवरच बंदी घाला अशी मागणी अखिल गोवा मासळी विक्रेता संघाने बुधवारी केली.

 मडगाव - फॉर्मेलिनचा वापर होत असल्यामुळे बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या मासळीवर बंदी घालण्याऐवजी या समस्येचे मूळ आहे त्या फॉर्मेलिनवरच बंदी घाला अशी मागणी अखिल गोवा मासळी विक्रेता संघाने बुधवारी केली. गोवा सरकारने शुक्रवार्पयत या समस्येवर तोडगा काढावा अन्यथा शनिवारी गोव्यातील सर्व मासळी विक्रेते पणजीतील आझाद मैदानावर एकत्र येऊन आंदोलन करतील, असा इशारा गोवा घाऊक मासळी विक्रेत्या संघाचे अध्यक्ष मौलाना इब्राहीम यांनी दिला. दरम्यान, सरकारने जरी मासळीच्या आयातीवर बंदी घातली नसली तरी आजपासून मासे विक्रेत्यांनीच अशा आयातीवर बंदी घातल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

सध्या महाराष्ट्र, कर्नाटक व केरळ राज्यातून गोव्यात येणा:या मासळीवर आज गुरुवारपासून बंदी सुरु होणार आहे. या बंदीचा फटका महाराष्ट्रातील मालवण, देवगड व रत्नागिरी तर कर्नाटकातील कारवार व मंगळुरू येथील मासळी व्यवसायावर परिणाम होणार आहे. मागच्या दोन दिवसांपासून ही बंदी सुरू झाल्याने गोव्यातील प्रमुख मासळीची बाजारपेठ असलेल्या मडगावात दररोज 60 ते 70 टन मासळी यायची त्याऐवजी गोव्यात पकडलेली दहा टनाच्या आसपास मासळी येऊ लागली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात मासळीची कमतरता भासू लागली आहे.या पाश्र्र्वभूमीवर बुधवारी मडगावच्या रवींद्र भवनात गोवाभरातील प्रमुख मासळी विक्रेत्यांचा मेळावा आयोजीत केला होता. त्यात घाऊक मासळी विक्रेते संघाचे अध्यक्ष मौलाना इब्राहीम, या संघटनेचे सदस्य कांता नाईक, ज्योकीम बॉर्जिस, म्हापसा मार्केट संघटनेच्या अध्यक्ष शशिकला गोवेकर, पणजी मार्केट संघटनेच्या अध्यक्ष इजाबेला डिकॉस्ता, मडगाव मासळी विक्रेत्यांचे अध्यक्ष फेलिक्स गोन्साल्वीस, आदींचा समावेश होता.यावेळी बोलताना इब्राहीम म्हणाले, फॉर्मेलिनच्या अफवेने गोव्यात मासळी विक्रीवर विपरित परिणाम झाला आहे. याचा थेट फटका मासे विक्रेत्यांवर झाला आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आमच्याशी चर्चा करा अशी मागणी गोवा राज्याचे मुख्य सचिव तसेच एफडीएचे मंत्री विश्वजीत राणे यांच्याकडे मागणी करुनही अद्याप आमच्याकडे कुणीही चर्चा केलेली नाही. एफडीएने घातलेल्या सगळ्या अटी आम्ही मान्य करू पण त्यापूर्वी आमच्याशी चर्चा करा आणि आमची बाजू ऐकून घ्या एवढीच आमची मागणी आहे. ही मागणी मान्य न झाल्यास आम्ही पणजीवर चाल करुन जाऊ असे ते म्हणाले.गोव्यात येणारी मासळी फॉर्मेलिनशिवाय आहे असा ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करायचा असेल  तर गोव्यातील प्रत्येक मासळी मार्केटमध्ये एफडीएने आपली प्रयोगशाळा सुरु करणे आवश्यक आहे. जेणेकरून ग्राहकांना मासळीविषयी कसलीही शंका आल्यास ते तिथल्या तिथे मासळीची चाचणी करुन आपल्या शंकेचे निरसन करु शकतील.  एकाबाजूने एफडीएचा परवाना घेण्यासाठी नगरपालिकेकडून व्यापार परवाना घेणे आवश्यक आहे. मात्र असा परवाना देण्याची पालिकेकडे कसलीच तजवीज नाही. असा एकंदर घोळ असल्यामुळे मासे विक्रेत्यांची पंचाईत होत आहे. या सर्व बाबींवर सरकारने तोडगा काढण्याची गरज आहे पण प्रत्यक्षात सरकारातील मंत्री फक्त आरोप करण्याशिवाय अन्य काहीही करत नाहीत. सरकारच्या या अनास्थेमुळे मासळी व्यावसायिकांची गतही खनिज व्यावसायिकांसारखी होईल, अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात आली.

टॅग्स :fishermanमच्छीमारgoaगोवा