शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

'बलुतं'ला गोव्यात मिळालेला सन्मान अविस्मरणीय - अजय कुरणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 22:54 IST

बलुतं या लघुपटाला गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये मिळालेला सन्मान अविस्मरणीय आहे, अशा शब्दात या लघुपटाचे दिग्दर्शक अजय कुरणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

-  संदीप आडनाईक पणजी : बलुतं या लघुपटाला गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये मिळालेला सन्मान अविस्मरणीय आहे, अशा शब्दात या लघुपटाचे दिग्दर्शक अजय कुरणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.गोव्यात सुरु असलेल्या ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सायंकाळी मुख्य चित्रपटाआधी २६ मिनिटांचा बलंतु हा लघुपट दाखविण्यात आला. तत्पूर्वी या लघुपटाचे दिग्दर्शक अजय कुरणे, निर्माते निखिल चुरी आणि कविता  चुरी, अभिनेत्री तनुजा कदम, आर्या कुरणे आणि संकलक अमित पाटील यांचा इफ्फीतर्फे सन्मानचिन्ह देउन सन्मान करण्यात आला. यावेळी कुरणे यांनी बलुतं ही व्यवस्था समजावून सांगितली. परंपरेने येणारा पुरुषप्रधान व्यवसाय करण्यास नाकारणाºया महिला नाभिक शांताबाई यादव यांनी कसा संघर्ष केला याबद्दल या लघुपटात प्रकाश टाकल्याचे कुरणे म्हणाले.लोकप्रिय अभिनेता स्वप्निल राजशेखर यांची पटकथा असलेल्या या लघुपटासाठी मंदार खरे यांनी पार्श्वसंगीत दिले आहे तर दिग्दर्शक अजय कुरणे यांनीच छायाचित्रण केले आहे. अजय खाडे यांनी निर्मिती व्यवस्था सांभाळली असून स्वप्निल पाटील कला दिग्दर्शक आहेत. उमेश बोळके, प्रमोद फडतरे, गिरिजा  घोडे, नरेंद्र देसाई, हेमंत धनवडे या अन्य कलाकारांनी या लघुपटात काम केले आहे. इफ्फीमध्ये येण्याचे स्वप्न पूर्ण इफ्फीसारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होणे, हे  माझे स्वप्न होते. माझ्या पहिल्याच लघुपटामुळे ते स्वप्न साकार झाले, यासारखा मोठा आनंद नाही. गोव्यात यापूर्वीही येउन गेलो, पण या निमित्ताने गोव्याच्या भूमीत स्वत:ची कलाकृती साकारताना पाहणे, हा वेगळा अनुभव होता, असेही कुरणे म्हणाले. बलुतंला मिळालेल्या प्रतिसादामुळे भारावून गेलो : निखिल चुरीबलुतं या लघुपटाला फिल्म फेस्टिव्हलमध्ये मिळालेला प्रतिसाद पाहून मी खूपच भारावून गेला आहे. या लघुपटाच्या कथेला लोकांनी खरोखरंच डोक्यावर घेतलेले आहे. त्यांच्या प्रतिसादाबद्दल मी खूपच समाधानी आहे. 

टॅग्स :IFFI Goa 2017इफ्फी गोवा 2017