शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पात करवाढ टाळा; सर्वसमावेशक प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 11:49 IST

गोवा चेंबर ऑफ कॉमर्सची मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन २०२६-२७च्या राज्य अर्थसंकल्पासाठी सविस्तर शिफारशी सादर केल्या. अध्यक्षा प्रतिमा धोंड यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष यतीन काकोडकर, सचिव रोहन भंडारे आणि चेंबर ऑफ कॉमर्सचे महासंचालक संजय आमोणकर याप्रसंगी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनात कर आकारणी, संशोधन व नवोन्मेष, अक्षय ऊर्जा, शेती, व्यापार, खाण, पर्यटन, उद्योग, एमएसएमई आणि आरोग्य क्षेत्रांवरील प्रस्तावांचा समावेश आहे. अतिरिक्त कर किंवा विद्यमान करांमध्ये वाढ करू नये, अशी ठाम मागणी संघटनेने केली आहे.

राज्यातील महामार्ग स्थानिक रस्त्यांसारखे वापरले जात असल्याने आणि बस-टॅक्सी सेवा कमकुवत असल्याने प्रमुख शहरे, विमानतळ, रेल्वे स्थानके, बस स्थानके यांना जोडणारी मास ट्रान्झिट प्रणाली विकसित करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. 

औद्योगिक वसाहतींमध्ये रस्ते, पाणी व वीज यासाठी अधिक निधी उद्योगांसाठी स्वतंत्र कच्च्या पाणी पुरवठा, मुख्यमंत्री रोजगार योजना अर्थसाहाय्य मर्यादा २५ लाखांवरून १ कोटी रुपये करण्याची मागणीही केली आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी, जीसीसीआयच्या प्रस्तावांचे कौतुक करत योग्य विचार केला जाईल, असे आश्वासन दिले.

मुख्यमंत्र्यांचा विविध घटकांशी संवाद

मुख्यमंत्र्यांनी आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर बार्जमालक संघटना, सीए आणि सीएस असोसिएशन, वेर्णा औद्योगिक वसाहत संघटना, टीटीएजी, मद्य व्यावसायिक, रेस्टॉरंट मालक, जीएसआयए, बीएनआय, गोवा फार्मा असोसिएशन, जीटीए आणि असोचॅम, काजू उत्पादक आणि इव्हेंट मॅनेजमेंट असोसिएशन; तसेच क्रेडाई, पेट्रोल पंप आणि खाणमालक संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

अग्निशामक दलाचे ना हरकत दाखले नियम सुलभकरणे, सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांसाठी दीडशे किलोवॅटपर्यंत कमी दाबाचा वीज पुरवठा, विद्यमान सौर धोरण ३१ मार्च रोजी संपत असल्याने नवीन धोरण आगाऊ जाहीर करावे.

रूफटॉप सोलर सबसिडी पुनर्रचना, गाव व शहरांमध्ये साप्ताहिक शेतकरी बाजार, खाण व पायाभूत सुविधा, पर्यटन व इव्हेंट उद्योग यासाठी एक खिडकी योजना, म्युझिक रॉयल्टी शुल्क सुलभ करणे, अॅप-आधारित टॅक्सीला प्रोत्साहन व मीटर अंमलबजावणी आधी मागण्या करण्यात आलेल्या आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Avoid tax hikes in budget: Comprehensive proposal submitted to CM

Web Summary : Goa Chamber of Commerce submitted budget recommendations to the CM, opposing tax increases. Proposals cover sectors like renewable energy, agriculture, and tourism. They also requested infrastructure development for industries and mass transit systems.
टॅग्स :goaगोवाBudgetअर्थसंकल्प २०२६Pramod Sawantप्रमोद सावंतbusinessव्यवसाय