शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

ड्रग्स प्रकरण : ख्रिस्तियन कोलरचे गेल्या पाच वर्षापासून गोवा कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 17:54 IST

हणजुणे येथे भाड्याच्या घरात ड्रग्सची प्रयोगशाळा सुरु केलेला ख्रिस्तियन कोलर हा ऑस्ट्रीयन ड्रग व्यावसायिक गेल्या पाच वर्षापासून गोव्यात येत होता.

ठळक मुद्देहणजुणे येथे भाड्याच्या घरात ड्रग्सची प्रयोगशाळा सुरु केलेला ख्रिस्तियन कोलर हा ऑस्ट्रीयन ड्रग व्यावसायिक गेल्या पाच वर्षापासून गोव्यात येत होता. गोव्यात विदेशी ग्राहकांना हेरुन तो अंमलीपदार्थ त्यांना पुरवित होता अशी माहिती उघड झाली आहे. गोव्यात पर्यटन मौसम सुरु झाल्यानंतर 2 ऑक्टोबरला  ख्रिस्तियन गोव्यात उतरला होता.

सुशांत कुंकळयेकर 

मडगाव - हणजुणे येथे भाड्याच्या घरात ड्रग्सची प्रयोगशाळा सुरु केलेला ख्रिस्तियन कोलर हा ऑस्ट्रीयन ड्रग व्यावसायिक गेल्या पाच वर्षापासून गोव्यात येत होता. गोव्यात विदेशी ग्राहकांना हेरुन तो अंमलीपदार्थ त्यांना पुरवित होता अशी माहिती उघड झाली आहे. याच संशयिताला यापूर्वी 2008 साली त्याच्या मायदेशातही अशाच प्रकारच्या गुन्ह्यात अटक झाली होती.

हणजुणे पोलीस स्थानकाचे निरीक्षक सी.एल. पाटील यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, गोव्यात पर्यटन मौसम सुरु झाल्यानंतर 2 ऑक्टोबरला  ख्रिस्तियन गोव्यात उतरला होता. हणजुणे येथे एक भाड्याचे घर घेऊन त्याने त्यात सिंथेटीक ड्रग्स बनविण्याची प्रयोगशाळा सुरू केली होती. 29 नोव्हेंबर रोजी हणजुण पोलिसांनी त्याच्या या घरावर धाड घातली असता, त्यांना या प्रयोगशाळेत 21 वेगवेगळ्या प्रकारची रसायने तसेच अंमलीपदार्थ असा एकूण एक कोटीचा माल सापडला होता. या धाडीत पोलिसांना 2 इंडक्शन प्लेटस्, 1 रेफ्रिजरेटर तसेच काही जार्स सापडली होती.

पाटील यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, मागची पाच वर्षे प्रत्येक पर्यटन मौसमाला  ख्रिस्तियन गोव्यात येत होता. सुरुवातीला त्याने गोव्यात ड्रग पेडलर म्हणून काम केले. केवळ विदेशी पर्यटकांनाच तो अंमलीपदार्थ पुरवित असे. मात्र बाहेरुन अंमलीपदार्थ मिळविणे कठीण झाल्यामुळेच यावेळी त्याने स्वत:च प्रयोगशाळा स्थापून अंमलीपदार्थ तयार करण्याचे काम सुरू केले.

वास्तविक केवळ संशयावरुन हा संशयित पोलिसांच्या ताब्यात आला. गस्तीवर असलेल्या हणजुणे पोलिसांनी त्याला संशयावरुन ताब्यात घेतले असता त्याच्याकडे सुमारे तीन लाखांचे अंमलीपदार्थ सापडले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्स सापडल्यानंतर पोलिसांनी तो राहत असलेल्या घराची झडती घेतली असता, पोलिसांच्या हाती हे प्रयोगशाळेचे मोठे घबाडच लागले.

टॅग्स :goaगोवाDrugsअमली पदार्थPoliceपोलिस