शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात एटीएम सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, धारगळमध्ये 2 एटीएम फोडून 32 लाख रुपये लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 16:46 IST

उत्तर गोव्यात एटीएम फोडून चोरी करण्याचे प्रकार वाढले आहेत. मागील तीन महिन्यात किमान चार एटीएम फोडण्याच्या प्रयत्न झाला.

म्हापसा : उत्तर गोव्यात एटीएम फोडून चोरी करण्याचे प्रकार वाढले आहेत. मागील तीन महिन्यात किमान चार एटीएम फोडण्याच्या प्रयत्न झाला. सोमवारी पहाटे पेडणे तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग 17 ला लागून असलेली दोन एटीएम धारगळ येथील फोडून चोरट्यांनी 32 लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे. वाढत्या या घटनांमुळे एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

सुमारे तीन महिन्यापूर्वी पेडणे तालुक्यातील आगरवाडा येथील स्टेट बँक आॅफ इंडियाचे एटीएम अंदाजीत 18 लाख रुपयांसहित चोरुन नेण्यात आले होते. या घटनेनंतर मागील दीड महिन्यापूर्वी पणजीत दोन एटीएममधून चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्नसुद्धा झाला होता. पहिला प्रयत्न सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे हाणून पाडण्यात आलेला तर त्यानंतर काही दिवसात पणजीतील बस स्थानकावरील एटीएमात चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न झालेला. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आलेली. 

सोमवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमाराला धारगळ येथील जुन्या टोलनाक्यापासून सुमारे २०० मीटर अंतरावरील राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या सोहम हरमलकर यांच्या इमारतीमधील स्टेट बॅँक आॅफ इंडियाचे एटीएम फोडून चोरट्यांनी सुमारे १७ लाख रुपये लंपास केले. तर येथूनच अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या कॉर्पोरेशन बॅँकेचे एटीएम फोडून सुमारे १५ लाख रुपयांची चोरी झाली. चोरट्यांनी दोन्ही एटीएमातून ३२ लाख रुपयांची रोखड लंपास केली आहे. 

याबाबत पेडणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली. या इमारतीचे मालक हरमलकर यांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. त्यात चार माणसे एटीएम फोडताना दिसत आहेत; परंतु स्पष्ट चेहरे दिसत नाहीत. सीसीटीव्हीचे फोटो तज्ज्ञ कमलेश गावस यांना खास बोलावून त्याची पाहणी केली; परंतु चेहरे मिळणे मुश्किल झाले. दोन्ही घटनामध्ये चोरटे समान असल्याचा कयास पोलिसांचा आहे. 

आज सकाळी एसबीआयची गाडी कॅश घेऊन ९.१५ च्या दरम्यान जेव्हा एटीएमकडे आली तेव्हा चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी आपल्या वरिष्ठांना फोन करून व नंतर पोलिसांना बोलाविले. पोलीस चौकशीसाठी बाहेर पडत असतानाच पोलिसांना कॉर्पोरेशन बॅँकेचे एटीएम फोडल्याची माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक चोडणकर हे आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी दोन्ही ठिकाणची पाहणी केली. घटनेचा पंचनामा केला. पोलिसांनी ठसे तज्ज्ञ व इतर आवश्यक त्या बाबीची तपासणी केली व काही महत्त्वपूर्ण वस्तू ताब्यात घेतल्या. एटीएम गॅस कटरने कापल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले. पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनंत गावकर पुढील तपास करीत आहेत. 

टॅग्स :Robberyदरोडाgoaगोवा