शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम माहिती चोरणारा सापडला, रोमानियन नागरिक गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 21:59 IST

एटीएम मशिनला स्टीमर लाऊन एटीएम कार्डमधील गोपनीय माहिती चोरणाºया एका रोमानिया देशाच्या  नागरिकाला पणजी पोलिसांनी पकडले.  एक वर्षापूर्वी कॉर्पोरेशन बँकेतील खाते दारांची खाते साफ करून हादरा देणारा गुन्हेगारही हाच असल्याची शक्यताही पोलिसांना वाटत आहे. 

पणजी - एटीएम मशिनला स्टीमर लाऊन एटीएम कार्डमधील गोपनीय माहिती चोरणाºया एका रोमानिया देशाच्या  नागरिकाला पणजी पोलिसांनी पकडले.  एक वर्षापूर्वी कॉर्पोरेशन बँकेतील खाते दारांची खाते साफ करून हादरा देणारा गुन्हेगारही हाच असल्याची शक्यताही पोलिसांना वाटत आहे. अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आलेक्स पेट्रिका असे असून तो रोमानिया देशचा नागरीक आहे. गोव्यात तो पर्यटन व्हीसावर आला होता आणि कळंगूट येथे तो रहायला असतो. पंजाब नेशनल बँकेचे व्यवस्थापक संतोष कुमार यादव यांनी यापूर्वी पणजी पोलीस स्थानकात तशी तक्रार नोंदविली होती. त्यामुळे पोलीस सतर्क होवून गस्ती घालत होते. प्पणजी चर्चस्क्वेअर परिसरात हा आलेक्स संशयास्पदरित्या फिरताना पोलिसांनी त्याला पाहिले. त्याला पोलिसांनी इथे काय करतो असे विचारल्यानंतर तो भांबावला आणि पळायला लागला. त्यानंतर पोलिसांनी पाटलाग करून त्याला पकडले आणि नंतर अटक केली. पंजाब नेशनल बँकच्या एटीएमलाच स्कीमर लावून ठेऊन तो इकडून तिकडे फिरत होता आणि त्यावेळीच तो पोलिसांच्या तावडीत सापडला. अटक केल्यानंतर तो माहिती देण्यास तयार नव्हता. परंतु पोलिसी दंडुक्यांचा प्रसाद खाल्यावर त्याने पंजाब नेशनल बँकेच्य एटीएमला स्कीमर लावून ठेवल्याची कबुली दिली. त्यामुळे त्याला घेऊन पोलीस त्या मशीनजवळ गेले. स्कीमर स्क्रीनच्या वर असलेल्या भागात अशा पद्धतीने चिकटविण्यात आला होता की एटीएमचा पासवर्ड मारताना सहज टीपला जाईल. स्कीमर काडण्यासाठीही खूप शक्ती लावावी लागली. त्यानेच तो स्कीमर नंतर काढून दिला. या बँकेतील खाते दारांच्या खात्यांची माहिती त्याने मिळविली असली तरी त्याचा उपयोग करून अद्याप खाते साफ करण्याचे उद्योग सुरू केले नव्हते. शक्य तितकी माहिती घेऊन न ंतर एकदम मोठा हात मारण्याचा त्याचा डाव असावा असे पोलीसांना वाटते. उपनिरीक्षक अरूण देसाई या प्रकरणात तपास करीत आहेत. 

वर्षापूर्वी  यानेच मारला होता डल्ला?एक वर्षापूर्वी  पर्वरी येथील एटीएममधून कॉर्पोरेश्न बँकेची  खाती साफ करणारा संशयितही हाच असण्याची शक्यता आहे. कारण त्यावेळी त्या  संशयिताबरोबर असलेल्या माणसाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते, तेव्हा पळून गेलेला माणूस रोमानिया देशाचा असल्याचे त्याने सांगितले होते. आलेक्सही रोमानियाचाच आहे. तसेच त्या संशयिताचे एटीएम कॅमºयाद्वारे टीपले गेलेले  छायाचित्रही आलेक्ससारखेच दिसत आहे.

टॅग्स :atmएटीएमgoaगोवाCrimeगुन्हा