शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मांडवीवरील टोलेजंग पूल बनला ‘अटल सेतु’, नितीन गडकरी आणि मनोहर पर्रीकर यांच्याहस्ते लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 22:01 IST

मांडवी नदीवरील तिस-या पुलाला माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे. केंद्रीय भुपृष्ट व अवजढ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या पुलाचे उद्घाटन करतानाच पुलाचे नाव ‘अटलसेतु’ असे जाहीर केले.

पणजी - मांडवी नदीवरील तिस-या पुलाला माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे. केंद्रीय भुपृष्ट व अवजढ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या पुलाचे उद्घाटन करतानाच पुलाचे नाव ‘अटलसेतु’ असे जाहीर केले. आजारी असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरही या कार्यक्रमाला उपस्थित होते. 

मांडवीवर उभारण्यात आलेल्या तिस-या पुलाला कुणाचे नाव द्यावे यावरूनही मोठा वादंग मातला होता. पुलाच्या नावावरून राजकारणही सुरू झाले होते. पुलाला गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाउसाहेब बांदोडकर यांचे नाव देण्याची मागणी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाकडून तर तत्कालीन विरोधीपक्षनेते व ओपिनियन पोलमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेले जॅक सिक्वेरा यांचे नाव देण्याचीही मागणी कॉंग्रेस व इतर विरोधी पक्षाकडून केली जात होती. परंतु दोन्ही पर्याय फेटाळून लावून वाजपेयी यांचेच नाव देण्यात आले. 

गोव्यातील मांडवी नदीवरील दोन्ही पुलांच्या मधोमद उंच अंतरावर उभारण्यात अलेला हा साडेपाच किलोमीटर अंतराचा पूल  पणजी शहरातील वाहतू समस्या मोठ्या प्रमाणावर हलकी करणार आहे. या पुलाचे अत्यंत विक्रमी कालावधीत बांधकाम करण्यात आल्यामुळे तो वापरासाठीही लवकरच खुला करण्यात येणार असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली होती. पुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु पंतप्रधान व्यस्त असल्यामुले गडकरी यांच्या हस्ते सायंकाळी पुलाचे उद्घाटन करण्यात आले.  २९ जानेवारी रोजी हा पूल वापरासाठी खुला करून दिला जाणार आहे.

टॅग्स :BJPभाजपाgoaगोवा