शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

आयआयटीच्या विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला; पाच ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 12:52 IST

फर्मागुडी येथील घटनेने खळबळ : दारुच्या बाटलीने डोक्यात वार

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : फर्मागुढी येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयआयटीच्या एका विद्यार्थ्यावर किरकोळ कारणावरून पाच जणांनी प्राणघातक हल्ला केला. सुदांशू पांडे असे जखमीचे नाव आहे. हल्ल्यावेळी संशयितांनी सुदांशूच्या डोक्यात दारूच्या बाटलीने वार केल्याने तो बेशुध्द पडला. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर आहे.

या प्रकरणी फोंडा पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. रघू नाईक (वय २७, रा. नागझर), श्रीवेद साळगावकर (वय २१, रा. दुर्गाभाट), प्रथम तारी (२३, रा. बांदोडा) व सनी कळंगुटकर (वय १८, रा. खडपाबांध), अशी त्यांची नावे असून, एका अल्पवयीनाची रवानगी अपना घरमध्ये केली आहे.

सविस्तर वृत्तानुसार, फर्मागुढी येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा परिसर रात्रीच्या वेळी मद्यपींचा अड्डा बनत चालला आहे. अनेक तरुण रात्रीच्या वेळी या ठिकाणी जमतात व मोठमोठ्याने गाणी लावून मद्यपान करतात. मंगळवारी रात्रीसुद्धा अशीच एक कार घेऊन पाचजण फर्मागुढी परिसरात आले होते. त्यावेळी आयआयटीचा विद्यार्थी असलेल्या सुदांशूने त्यांना तिथून जाण्यास सांगितले. सुदांशूच्या या गोष्टीचा राग धरून संशयितांनी त्याला बेदम मारहाण केली. त्याचवेळी एकाने स्वत:जवळील दारूच्या बाटलीने सुदांशूच्या डोक्यात वार केल्याने तो जागीच बेशुद्ध पडला.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सुदांशूला फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळात दाखल केले. त्यानंतर पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक रश्मी भाईडकर पुढील तपास करत आहेत.

पळून जाण्याचा प्रयत्न

संशयितांची चौकशी चालू असताना अल्पवयीन असलेल्या संशयिताने पोलिसांची नजर चुकवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला पाठलाग करत पकडून पुन्हा पोलिस ठाण्यात आणले. यावेळी अल्पवयीन संशयिताचे नातेवाइक पोलिस ठाण्यातच होते. या प्रकरानंतर पोलिसांनी त्यांना बाहेर काढले.

इथे रात्रीचे येऊन बघाच

गोवा इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅम्पसमध्ये रोजच मद्यपींचा धिंगाणा चालू असतो. यातूनच वादावादी, मारहाणीच्या अनेक घटना घडल्या आहेत. परंतु, कालचा प्रसंग गंभीर असल्यामुळेच हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचू शकले. यापुढे अशी घटना घडू नये, यासाठी या परिसरात पोलिसांनी गस्त घालण्याची मागणी होत आहे. 

 

टॅग्स :goaगोवा