शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

'द अ‍ॅस्पर्न पेपर्स' ने केली निराशा, सिनेमाला प्रतिसाद फारसा मिळाला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 01:29 IST

- संदीप आडनाईक  पणजी : 'द अ‍ॅस्पर्न पेपर्स' ने ४९ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा पडदा मंगळवारी उघडला, परंतु केवळ निमंत्रितांसाठी ...

- संदीप आडनाईक 

पणजी : 'द अ‍ॅस्पर्न पेपर्स' ने ४९ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा पडदा मंगळवारी उघडला, परंतु केवळ निमंत्रितांसाठी असलेल्या या उद्घाटनाच्या सिनेमाने रसिकांची निराशा केली.  पूर्वायुष्यातील प्रेमाविषयीची घटना चव्हाट्यावर येऊ नये, यासाठी नायकाने दिलेला केलेला आटापिटा आणि त्याच आठवणी जपत आयुष्य कंठणा-या प्रियतमेचा कणखरपणा असा या सिनेमाचा विषय होता. पदार्पणातच वेगळा विषय मांडण्याचा दिग्दर्शकाने प्रयत्न केला असला तरी रंजकता कमी होती. त्यामुळे या सिनेमाला प्रतिसाद फारसा मिळाला नाही. विनोदाची पखरण आणि फ्लॅशबॅकचे पारंपारिक तंत्र वापरुन हा सिनेमा पडद्यावर आणला आहे. अ‍ॅडाप्शन आॅफ हेन्री जोन्स या जीन पेव्हन्स यांच्या कादंबरीवर आधारित हा 'द अ‍ॅस्पर्न पेपर्स' सिनेमा बेतलेला आहे. ज्युलियन लाँडिस हे फ्रेंच अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी पूर्ण लांबीचा सिनेमा केला आहे. यापूर्वी त्यांनी अनेक लघुपट, फॅशन सिनेमा, जाहिराती, सांगितिका दिग्दर्शित केल्या आहेत. जेफ्री अ‍ॅस्पर्न या रोमँटिक कवयित्री. सिनेमाचा नायक मॉर्टनविट हा तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेला लेखक प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. त्याच्यावर जेफ्रीचा प्रभाव आहे. व्हेनिसमध्ये असताना प्रेमिका जूलियाना बोर्डरो हिचा लिहिलेल्या प्रेमपत्राचा संदर्भ या सिनेमाचा गाभा आहे. जूलियाना तिची भाची मिस टीनासोबत आता व्हेनिसजवळील वेनेटियन पलाजो येथे राहते आहे. प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या नायकाला प्रेमपत्राचा दुरुपयोग होईल अशी भीती वाटत असते. त्यातून तो जूलियानाच्या भाचीसोबत जवळीक साधू इच्छित आहे. काहीही करुन त्या पत्रांचा शोध घेणे हे त्याचे ध्येय आहे. परंतु जूलियाना त्याला दाद लागू देत नाही. मॉर्टनविटचा खरा हेतू जेव्हा मिस टीनाला समजतो, तेव्हा ती ही सारी प्रेमपत्रे नष्ट करते.खासगी आयुष्यातील गुपिते जतन करण्यासाठी हा सारा प्रपंच. प्रकाशझोतात असलेल्या लेखकामुळे खासगी आयुष्यावरही कशी गदा येते, हे या सिनेमातून मांडण्यात आले आहे. कित्येक वर्षे आपले जीवन प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या कुटूंबावर अचानक वलयांकित प्रसिध्दीला सामोरे जावे लागते. त्यामुळे त्या कुटुंबीयावर आघात होतो. मिस टीना या सा-या प्रकरणात अतिशय कणखर भूमिका घेताना दिसते. वेळ येताच कोमलह्दयी टीना टोकाची भूमिका घेते आणि आपल्या जीवलगांची गुपिते गुप्तच ठेवण्यात यशस्वी ठरते.चित्रपटाची मांडणी काहीशी पारंपारिक फ्लॅशबॅक तंत्रातून उलगडते. परंतु विनोदाची पखरण करत आशयसूत्र पुढे नेण्यात दिग्दर्शक अपयशी ठरला आहे.

टॅग्स :IFFIइफ्फी