शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
2
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
3
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
4
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
5
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले
6
ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक
7
Accident: पाण्याचा टँकर आणि दुचाकीत भीषण धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
8
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
9
VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...
10
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
11
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी मालिकाविश्वातील 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, स्वतः दिली माहिती
12
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
13
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
14
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार
15
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
16
Viral News: एका उंदरामुळं इंडिगोच्या विमानाला साडेतीन तास उशीर, नेमकं काय घडलं?
17
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
18
अमूलनं बटर, तूप, चीज, आईस्क्रीम आणि चॉकलेटच्या किमती केल्या कमी; प्रत्येक वस्तूवर किती बचत होणार? जाणून घ्या
19
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
20
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री

नोटाबंदी फसल्याने मोदींनी पायउतार होऊन प्रायश्चित घ्यावे, माजी केंद्रीय मंत्र्याचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 18:45 IST

दोन वर्षांपूर्वी ८ नोव्हेंबर रोजी मोदी सरकारने केलेली नोटबंदी सपशेल अपयशी ठरल्याने पापाचे प्रायश्चित म्हणून मोदी यांनी पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे आणि तसे न केल्यास आगामी लोकसभा निवडणुकीत लोकांनी भाजपला धडा शिकवावा, असे आवाहन प्रदेश काँग्रेसने केले आहे.

पणजी : दोन वर्षांपूर्वी ८ नोव्हेंबर रोजी मोदी सरकारने केलेली नोटबंदी सपशेल अपयशी ठरल्याने पापाचे प्रायश्चित म्हणून मोदी यांनी पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे आणि तसे न केल्यास आगामी लोकसभा निवडणुकीत लोकांनी भाजपला धडा शिकवावा, असे आवाहन प्रदेश काँग्रेसने केले आहे.काँग्रेसचे प्रदेश मुख्य प्रवक्ते अ‍ॅड. रमाकांत खलप म्हणाले की, नोटाबंदीचा केंद्र सरकारचा निर्णय घिसाडघाईने घेतला गेला. लोकांना चलन बदलून घेण्यासाठी पुरेसा अवधीही दिला नाही. मोदी सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता हिरावून घेतली. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदावरुन एका रात्रीत रघुराम राजन यांना हटवून ऊर्जित पटेल यांना आणले.चलनातून पाचशे आणि हजाराच्या नोटा काढून टाकताना नव्या नोटा छापण्यासाठी तब्बल २२ हजार कोटी रुपये खर्च केले. काळा पैसा बाहेर काढण्यासाठीच्या उद्देशाने नोटाबंदी आणली परंतु प्रत्यक्षात १0 हजार कोटी रुपयेच रिझर्व्ह बँकेत आले. याचा अर्थ १२ हजार कोटी रुपयांचे नुकसानच झाले. देशाचे एकूण स्थानिक उत्पन्न ९ टक्क्यांवरून ७.५ टक्क्यांपर्यंत खाली आले. खलप म्हणाले की, देशभरातील सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, सर्वसामान्यांचे दिवशी उत्पन्न सरासरी २00 रुपये असते. नोटाबंदीमुळे एकूण लोकसंख्येपैकी दोन-तृतीयांश लोकांचे उत्पन्न बुडाले. आर्थिक व्यवहारांच्या डिजिटलायझेशनमुळे विदेशी कंपन्यांना फायदा झाला. पेटीएमचा व्यवसाय ४५0 टक्क्यांनी वाढला. नफा १५0 टक्क्यांनी वाढला. २५ कोटी भारतीयांनी पेटीएमसाठी नोंदणी केली. हे काम भारतीय बँकांच्या माध्यमातूनही करता आले असते.स्वाभिमान असेल तर पार्सेकरांनी सोपटेंना पराभूत करण्यासाठी वावरावेदरम्यान, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना खरोखरच स्वाभिमान असेल तर त्यांनी मांद्रे मतदारसंघात आगामी निवडणुकीत सोपटे यांचा पराभव करण्यासाठी वावरावे, असे खलप म्हणाले. आगामी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारीसाठी दावा करणार काय, या प्रश्नावर थेट उत्तर न देता ते असे म्हणाले की, मांद्रेतील लोकांना त्यांचे प्रश्न विधानसभेत मांडण्यासाठी प्रभावी आमदाराची गरज आहे. विधानसभेत चांगले कायदे करण्यासाठी चर्चेत भाग घेऊ शकेल, अशा अभ्यासू आमदाराची गरज आहे. या दोन्ही पात्रता आपल्याकडे असल्याचे त्यांना अप्रत्यक्षपणे सुचवायचे होते. लोकसभेबरोबरच विधानसभेच्याही मध्यावधी निवडणुका लागल्या तर आपण स्थानिक राजकारणात राहणे पसंत कराल की केंद्रीय राजकारणात जाल, असा सवाल केला असता त्याबद्दल अजून काही विचार केलेला नाही, असे ते म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेस