शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मगोपला न्यायालयात उत्तर देणार - विनय तेंडुलकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 16:56 IST

मगोपने न्यायालयात जी याचिका सादर केली आहे, त्यामागे सरकारमध्ये अस्वस्थता निर्माण करावी असा हेतू आहे. तथापि, भाजपला त्या याचिकेची मुळीच भीती वाटत नाही.

पणजी - मगोपने न्यायालयात जी याचिका सादर केली आहे, त्यामागे सरकारमध्ये अस्वस्थता निर्माण करावी असा हेतू आहे. तथापि, भाजपला त्या याचिकेची मुळीच भीती वाटत नाही. त्या याचिकेला भाजप योग्य ते उत्तर न्यायालयातच देईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. मगोपचे नेते व मंत्री सुदिन ढवळीकर यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास असून लोकसभा व विधानसभेच्या पोटनिवडणुकीवेळी मगोपकडून भाजपला पाठींबा दिला जाईल याचीही खात्री आहे, असे तेंडुलकर व सरचिटणीस सदानंद तानावडे म्हणाले.

मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर हे विविध विधाने करून लोकांची करमणूक करत आहेत. सरकार चांगले चालले आहे. मंत्री सुदीन ढवळीकर हेही सरकारमध्ये चांगले काम करत आहेत. मगोपने उच्च न्यायालयात याचिका सादर करून सरकारमध्ये अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याचा आम्ही निषेध करतो. मगोपवर आम्ही याचिका मागे घेण्यासाठी कसलाच दबाव टाकत नाही. त्या पक्षाने याचिका मागे घ्यावी अशी आम्ही विनंती देखील करत नाही. न्यायालयच काय तो निवाडा देईल, असे तेंडुलकर व तानावडे म्हणाले. 

मगोपचे मंत्री ढवळीकर हे गोव्याबाहेर असल्याने बुधवारी आम्ही त्यांच्याशी बोलू शकलो नाही पण मंत्री बाबू आजगावकर व दिपक प्रभू पाऊसकर ह्या दोन्ही मगो आमदारांशी आम्ही बोललो. ते सरकारसोबतच आहेत. त्यांची काही तक्रार नाही. मगोपचे अध्यक्ष ढवळीकर हे हास्यास्पद बोलत व वागत आहेत. मगो पक्षातच फुट पडेल असे कदाचित दिपक ढवळीकर यांना  वाटत असावे व त्यामुळे न्यायालयात धाव घेतली गेली असावी, असे तेंडुलकर म्हणाले. ज्येष्ठ मंत्र्याकडे मुख्यमंत्रीपदाचा ताबा द्यावा, अशी मागणी मगो पक्ष करत असल्याविषयी पत्रकारांनी विचारताच भाजपचे केंद्रीय नेतृत्व योग्य निर्णय योग्यवेळी घेईल एवढेच तेंडुलकर यांनी सांगितले. आम्ही केंद्रीय नेत्यांच्या रोज संपर्कात असतो असे ते म्हणाले.

मगोपने लोकसभा व विधानसभेच्या पोटनिवडणुकीवेळी उमेदवार उभे करण्याचा इशारा दिला असल्याविषयी बोलताना तेंडुलकर म्हणाले, की सुदिन ढवळीकर हे मगोपचे विधिमंडळ नेते आहेत. मगोकडून लोकसभा निवडणुकीवेळी व विधानसभेच्या पोटनिवडणुकीवेळीही भाजपला सहकार्य मिळेल. मगोपचे उमेदवार रिंगणात नसतील याची काळजी मंत्री ढवळीकर घेतील. काँग्रेसविरुद्ध केवळ भाजपचेच उमेदवार असतील.

दरम्यान, भाजपचे सगळे आमदार पुढील विधानसभा अधिवेशनावेळी अधिवेशनास उपस्थित राहतील, असेही तेंडुलकर यांनी पत्रकारांच्या प्रश्नादाखल सांगितले. भाजपचे तीन-चार आमदार असाध्य आजारामुळे अंथरुणास खिळलेले आहेत, असे मगोपने याचिकेत म्हटले आहे. त्यावर तेंडुलकर यांनी तसे काही नाही, आमचे आमदार सुस्थितीत आहेत, असे सांगितले.

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारणgoaगोवा