शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात अमोनिया वायूने भरलेला टँकर पलटला, गाव केलं रिकामं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 11:27 IST

वास्को सिटी आणि पणजीला जोडणा-या महामार्गावर अमोनिया वायूने भरलेला टँकर पलटी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पणजी - वास्को सिटी आणि पणजीला जोडणा-या महामार्गावर अमोनिया वायूने भरलेला टँकर पलटी झाल्याने गोव्यात एकच खळबळ उडाली आहे. दोन महिलांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोव्यातील चिकालीम गावाजवळ हा अपघात झाल्यामुळे गावातील घरे रिकामी करण्यात आली असून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. 

शुक्रवारी मध्यरात्री पावणेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. मुरगाव जेटीवरून अमोनिया वायू घेऊन जुवारी उद्योगाच्या दिशेने निघालेला टँकर चिखली येथे दाबोळी विमानतळ रस्त्यावर उलटला पडण्याची घटना शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली. यामुळे वायू गळती झाली व परिसरातील लोकांना अस्वस्थ वाटू लागले. मोठी खळबळ उडाल्यानंतर राज्य सरकारच्या यंत्रणोचीही धावपळ सुरू झाली.  शुक्रवारी (19 जानेवारी) चिखली परिसरातील चार विद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.

मुरगाव, वास्को, दाबोळी, चिखली हा सगळा परिसर औद्योगिकरण झालेला आहे. संध्याकाळी सात वाजेनंतर वायू घेऊन आणि अन्य औद्योगिक माल घेऊन मोठे टँकर व ट्रक विमानतळ मार्गावरून धावत असतात. मध्यरात्री अशा वाहनांची वाहतूक ही जास्त असते. अमोनिया वायू गळती होण्याची मोठी घटना अलिकडे गोव्यात घडली नव्हती. चिखली येथे हा टँकर उलटून पडला त्यावेळी परिसरातील लोक साखरझोपेत होते. अमोनिया वायू गळतीमुळे लोकांना अस्वस्थ वाटू लागले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी टँकर चालकाला ताब्यात घेतले. शासकीय यंत्रणोला माहिती मिळाल्यानंतर धावपळ सुरू झाली. मुख्य सचिव धर्मेद्र शर्मा यांनी आरोग्य मंत्र्यांशी चर्चा केली व तातडीने 108 रुग्णवाहिका सेवेखाली चार रुग्णवाहिका मागवून घेतल्या.

एमपीटीच्याही रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. लोकांनी घराबाहेर पडू नये अशी सूचना करण्यात आली. सकाळी 9 वाजेनंतर स्थिती सुधारली. सलग पाच तास टँकरवर पाण्याचा फवारा केला गेला. आता स्थिती पूर्ण नियंत्रणात आहे. लोकही सुरक्षित आहेत. कुणालाही इजा पोहोचलेली नाही. रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. शाळांना सुट्टी दिली गेली आहे. वास्को, चिखली तसेच विमानतळ मार्गावर लहानमोठे अपघात सतत घडत असतात. वायू गळतीचा अनुभव मात्र प्रथमच आला. 

दरम्यान, गोव्यात अगोदरच शुक्रवारी पर्यटक टॅक्सींचा संप सुरू झाला आहे. यामुळे पर्यटक चिंतेत आहेत. तशात पुन्हा वायू गळतीची घटना घडल्यानंतर त्याबाबत सर्वत्र चर्चा सुरू झाली व चिंताही व्यक्त होऊ लागली. टॅक्सी व्यवसायिकांनी पूर्णपणे बंद पाळल्यामुळे पर्यटकांना व स्थानिकांनाही थोडी गैरसोय जाणवत आहे. तथापि, गोवा पर्यटन विकास महामंडळ, कदंब वाहतूक महामंडळ व अन्य यंत्रणांनी मिळून वाहतुकीची पर्यायी व्यवस्था केली आहे

टॅग्स :goaगोवा