शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

इफ्फीच्या उद्घाटनास अमिताभ बच्चन, आशा भोसलेंना निमंत्रित करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 20:32 IST

20 नोव्हेंबरपासून इफ्फीला प्रारंभ होणार

पणजी : पन्नासाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास (इफ्फी) येत्या दि. 20 नोव्हेंबरला आरंभ होणार आहे. इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी यावेळी खास अमिताभ बच्चनआशा भोसले यांना निमंत्रित करावे असे दिल्लीत चित्रपट महोत्सव संचालनालयाच्या पातळीवर ठरले असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली.अमिताभ बच्चन यांच्या हस्ते इफ्फीचे उद्घाटन करावे व खास निमंत्रित म्हणून आशा भोसलेंना निमंत्रित करावे असा आयोजकांचा विचार आहे. इफ्फीच्या तयारीने पणजीत वेग घेतला आहे. शहरात रंगकाम सुरू झाले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी इफ्फीशीनिगडीत कामांच्या तयारीचा सोमवारी आढावा घेतला. गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांच्याकडूनही मुख्यमंत्र्यांनी सगळी माहिती जाणून घेतली.इफ्फी यशस्वी करण्यासाठी सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांचे सहकार्य व मदत गरजेची असते. मुख्यमंत्र्यांनी त्यानुसार खात्यांना सूचना केल्या आहेत. इफ्फीसाठी सध्या देश-विदेशातून साडेचार हजार प्रतिनिधींची नोंदणी झाली आहे. यावेळी दहा हजारांपर्यंत संख्या जाऊ शकते. फळदेसाई यांच्या मते इफ्फीची सगळी तयारी 15 नोव्हेंबर्पयत पूर्ण होईल. सगळ्या कामांच्या निविदांना येत्या 17 तारखेपर्यंत अंतिम रुप देऊन कंत्राटदार कंपन्या निश्चित केल्या जाणार आहेत. उद्घाटन व समारोप सोहळ्यासाठी इव्हेन्ट मॅनेजमेन्ट कंपनी यापूर्वीच ठरलेली आहे. येत्या २० तारखेपर्यंत तयारीच्या स्थितीची सगळी माहिती गोवा मनोरंजन संस्थेकडून केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयासमोर ठेवली जाणार आहे.इफ्फीची जाहिरात देशातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये केली जाणार आहे. वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने जाहिरात करण्याच्या उपक्रमाला कारवा असे नाव दिले गेले आहे. येत्या 16 रोजी चेन्नईमधून या जाहिरात पर्वाला आरंभ होईल. इफ्फीच्या आयोजनाविषयी प्रसार करणारे वाहन चेन्नई, हैद्राबाद, दिल्ली, मुंबई आदी शहरांमध्ये फिरवले जाईल. 

टॅग्स :IFFIइफ्फीAmitabh Bachchanअमिताभ बच्चनAsha Bhosaleआशा भोसले