शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आधीच पाणीटंचाई त्यात कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे जलवाहिनी फुटली; नागरिकांची गैरसोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 18:53 IST

सांताक्रुझ, सांतआंद्रेत आठ दिवस नळ कोरडे, पुन्हा जलवाहिनी फुटली, कंत्राटदाराची हलगर्जी

पणजी : तिसवाडी तालुक्यातील कालापुर येथे रस्त्याचे काम करताना कंत्रटदाराने प्रचंड बेपर्वाई केली. परिणामी रात्री तिथे जलवाहिनी फुटली. यामुळे सांताक्रुझ आणि सांतआंद्रे मतदारसंघांतील बहुतेक गावांमधील सगळे नळ सलग आठव्या दिवशी कोरडपे पडले. कंत्राटदार व बांधकाम खात्याच्या हलगर्जीपणाविषयी सांताक्रुझचे आमदार टोनी फर्नाडिस यांनीही प्रचंड संताप व्यक्त केला.

खांडेपार येथे 9 मिमी व्यासाची जलवाहिनी सात दिवसांपूर्वी फुटल्यामुळे अगोदरच पूर्ण तिसवाडी तालुका पाण्यावीना होरपळला. राजधानी पणजीसह विविध भागांना सात दिवस पाण्यावीना रहावे लागले होते. खांडेपार येथे जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर पणजीसाठी पाणी पुरवठा गुरुवारी सकाळी सुरू झाला. आल्तिनो येथील टाकीत रात्री नऊ वाजता पाणी पोहचले. आठ टाक्या भरेर्पयत सकाळचे सात उजाडले. त्यानंतर पाणी पुरवठा जरी सुरू झाला तरी, पणजीतील सर्व भागांना पाणी पोहचले नाही. सकाळी अकरा वाजेर्पयत तरी पणजीतील काही भागांतील नळ कोरडेच होते. आल्तिनो येथील घरांमधील नळांना सकाळी सात वाजल्यानंतर पाणी आले. पणजीतील ज्या भागांना पाणी मिळाले, ते पाणी गढूळ होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास नळाचे पाणी पुन्हा बंद झाले. तथापि, सात दिवसांनंतर पाणी आल्यामुळे पणजीतील लोकांमध्ये आनंद व्यक्त होत असतानाच कालापुर येथे जलवाहिनी फुटल्याचे वृत्त येऊन थडकले.

कालापुर जंक्शनच्या जरा पुढे जलवाहिनीची पर्वा न करताच महामार्गाचे काम करण्यात येत आहे. जलवाहिनी न हटविता, जलवाहिनीवरूनच रस्त्याचे काम केले जाते. तिथे जलवाहिनी फुटली. यामुळे आठव्या दिवशीही सांताक्रुझ व सांतआंद्रेमधील लोकांना पाणी मिळू शकले नाही. लोकांचे यामुळे खूपच हाल होत आहेत. लोक कंत्रटदाराविषयी व बांधकाम खात्याविषयीही तीव्र संताप व्यक्त करत आहेत. सांताक्रुझचे आमदार टोनी फर्नाडिस यांनी कालापुर येथे भेट दिली व संबंधित अधिका:यांना फैलावर घेतले.

सांतआंद्रे व सांताक्रुझमध्ये अनेक रेस्टॉरंट्स आहेत. त्यांची गैरसोय झाली आहे. शिवाय बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळातही पाण्यावीना शौचालये वगैरे तुंबली आहेत. सरकारचे त्याकडे लक्षच नाही. पाळे, शिरदोन, कुडका, बांबोळी, आल्त सांताक्रुझ आदी भागांतील लोकांना सलग आठ दिवस प्रथमच पाण्यावीना रहावे लागले आहे. लोक टँकर व पाण्याच्या बाटल्या शोधतात. सांतआंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांच्याशी काही लोकांनी संपर्क साधला व टँकर पाठवा अशी विनंती केली. मात्र ते सर्वासाठीच टँकरची सोय करू शकले नाही.

महामार्गाचे काम करताना संबंधित यंत्रणा काळजीच घेत नाही हे संतापजनक आहे. कोणत्याही स्थितीत लवकर जलवाहिनी दुरुस्त करा व सांताक्रुझ-सांतआंद्रेला पाणी पुरवा असे मी अधिका:यांना सांगितले आहे. अगोदरच आठ दिवस लोकांचे पाण्यावीना खूप हाल झाले आहेत. भोंगळ कारभार सुरू आहे. खूप राग येतोय. - टोनी फर्नाडिस, आमदार, सांताक्रुझ

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईgoaगोवा