शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहिता संपताच मंत्र्यांना खात्यांचे वाटप, मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 19:34 IST

राज्यातील निवडणूक आचारसंहिता अगोदर संपूष्टात येऊ द्या. आचारसंहिता संपल्यानंतर आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना अतिरिक्त खात्यांचे वाटप केले जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी येथे सांगितले.

पणजी : राज्यातील निवडणूक आचारसंहिता अगोदर संपूष्टात येऊ द्या. आचारसंहिता संपल्यानंतर आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना अतिरिक्त खात्यांचे वाटप केले जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी येथे सांगितले. सर्व मंत्र्यांना अतिरिक्त खाती द्यावीत असे प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत ठरले होते.मात्र लोकसभा निवडणुकीवेळी सर्व मंत्र्यांनी काम करायला हवे या अपेक्षेने खाते वाटप लांबणीवर टाकले गेले होते. खाते वाटप त्यावेळीच केले असते तर मनासारखी खाती मिळाली नाही म्हणून काही मंत्री नाराज झाले असते व कदाचित त्यांनी लोकसभा निवडणुकीवेळी भाजपच्या उमेदवारांना दगाफटका केला असता. त्यामुळे खाते वाटप मुख्यमंत्र्यांनी स्थगित ठेवले होते याची कल्पना अनेक मंत्र्यांना आलेली आहे.पत्रकारांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांना खाते वाटपाच्या विषयाबाबत विचारले असता, अजून आचारसंहिता आहे ना, त्यामुळे आपण काही भाष्य करत नाही पण आचारसंहिता संपल्यानंतर खाती देता येतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.जीआरएसएफला पाठिंबा दरम्यान, गोव्यातील रस्ता सुरक्षेसाठी काम करणा-या जीआरएसएफ ह्या एनजीओला मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिला व संस्थेचे कौतुक केले. संस्थेच्या वृत्त मासिकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन केले गेले. यावेळी दिलीप नाईक, नारायण नावती, प्रमोद सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते. रस्त्यावरील अपघात कमी व्हावेत, अपघातात कुणाचे बळी जाऊ नये म्हणून ही संस्था काम करते. त्यासाठी पदरमोडही करते. आपण रस्त्यांवर धोक्याची कल्पना देणारे फलक लागावेत म्हणून पाऊले उचलीन, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. 80 टक्के रस्त्यांना साईनेजीस नाहीत आणि 90 टक्के गोमंतकीय वाहतूक नियमांचे पालनच करत नाहीत. यामुळे अपघात घडतात. यासाठी खूप जागृती होण्याची गरज आहे. शालेय अभ्यासक्रमातच वाहतूक नियम पालनाचे धडे असावेत. सर्व प्रकारच्या आपत्तींवेळी मदत करता यावी म्हणून 112 क्रमांकाच्या वाहिनीचे सरकार लवकरच गोव्यातही उद्घाटन करील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.