शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील सर्व रस्ते चतुर्थीपूर्वी खड्डेमुक्त करू- पाऊसकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 17:26 IST

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्र्यांचं आश्वासन

पणजी : राज्यातील सर्व रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत ही गोष्ट खरी आहे. सरकार त्याविरुद्ध येत्या गणेश चतुर्थीपूर्वी उपाययोजना करील. राज्यभरातील सगळे रस्ते खड्डेमुक्त करून त्यात सुधारणा केली जाईल, असे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दिपक प्रभू पाऊसकर यांनी मंगळवारी विधानसभेत जाहीर केले.सांताक्रुझचे आमदार टोनी फर्नाडिस व अन्य आमदारांनी राज्यातील खराब रस्त्यांविषयी पाऊसकर यांना अनेक प्रश्न विचारले. तसेच रस्त्यांच्या बाजूची झुडपे कापणे व गटारे स्वच्छ करण्याचे काम हे चतुर्थीपूर्वी व्हायला हवे असेही फर्नाडिस म्हणाले. उत्तरादाखल बोलताना मंत्री पाऊसकर म्हणाले, की यावेळी गोव्यात डांबराचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे ३० टक्के रस्त्यांवर हॉटमिक्स कार्पेट घालता आले नाही. त्यामुळेही रस्त्यांवर सध्या खड्डे दिसून येतात. हे खड्डे बुजवले जातीलच. चतुर्थीवेळी लोकांना चांगले रस्ते मिळतील. हॉटमिक्स कार्पेट घातल्यानंतरही जर रस्त्यांवर खड्डे पडले तर तीन ते पाच वर्षे त्या रस्त्यांची देखरेखही संबंधित कंत्राटदारांनाच करावी लागेल. खड्डे पडल्यास कंत्रटदारांना ते स्वखर्चाने बुजवावे लागतील. कंत्रटदारांनी जर खड्डे बुजवले नाहीत तर सरकारकडे कंत्रटदारांची जी रक्कम असते, त्या रक्कमेमधून आम्ही ते काम करून घेऊ. तसेच अशा कंत्रटदारांना मग पुन्हा बांधकाम खात्याकडून काही काम दिले जाणार नाही.बांधकाम खात्यात आपत्कालीन काम विभाग सुरू केला जावा, अशी सूचना कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी केली. अशा विभागाला विशेष अधिकार दिले जावेत. काहीवेळा तातडीने कामे करायची असतात. हा विभाग विशेष अधिकार वापरून काम करून घेऊ शकेल, असे रेजिनाल्ड म्हणाले. काही वर्षापूर्वी खड्डे बुजवण्यासाठी बांधकाम खात्याने यंत्र खरेदी केले होते, त्या यंत्राचे काय झाले अशी विचारणा काँग्रेसचे आमदार प्रतापसिंग राणे यांनी केली. ते यंत्र सध्या चालत नाही, आम्ही नवे यंत्र लवकरच खरेदी करू व त्या यंत्राद्वारे रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेऊ, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर केले.

टॅग्स :goaगोवाPotholeखड्डे