शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील खाण अवलंबितांची राजधानीत ‘पोटासाठी शेवटची हाक’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 11:33 IST

मार्च महिन्यात 16 तारखेपासून बंद होणाऱ्या खाणी सुरू राहाव्यात, या मागणीसाठी बुधवारी खाणव्याप्त तालुक्यांतील खाण अवलंबितांनी एकत्रित येऊन आझाद मैदानावरील जाहीर सभेने सरकारचे लक्ष वेधले.  

पणजी : मार्च महिन्यात 16 तारखेपासून बंद होणाऱ्या खाणी सुरू राहाव्यात, या मागणीसाठी बुधवारी खाणव्याप्त तालुक्यांतील खाण अवलंबितांनी एकत्रित येऊन आझाद मैदानावरील जाहीर सभेने सरकारचे लक्ष वेधले.  सर्वोच्च न्यायालयाने एक आठवडय़ापूर्वी दिलेल्या निवाडय़ानुसार राज्यातील 88 खाणी 15 मार्चपासून बंद होणार आहेत. त्यामुळे या खाणींवर अवलंबून असलेल्या बाजर, ट्रक, मशिनरीजचे मालक, कामगार यांच्या रोजीरोटीची प्रश्न निर्माण होणार आहे. त्यासाठी खाणीवर अवलंबून असणाऱ्या खाण व्याप्त तालुक्यांतील सर्व कामगारांसह त्या व्यवसायाशी निगडित लोकांनी आज येथील आझाद मैदानावर ‘पोटासाठी शेवटची हाक’ हे ब्रिद वाक्य घेऊन एकत्रित जमून आंदोलन करीत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आझाद मैदानावर सकाळी नऊ वाजल्यापासून लोक जमण्यास सुरुवात झाली. जाहीर सभेला पाठिंबा देण्यासाठी सरकार पक्षातील आमदार राजेश पाटणोकर, दीपक पावसकर आणि प्रसाद गावकर यांनी उपस्थिती लावून अवलंबितांच्याबरोबर मैदानावर ठाण मांडले. याप्रसंगी अखिल गोवा बार्ज मालक असोसिएशन, धारबांदोडा तालुका ट्रक मालक असोसिएशन, ऑल गोवा मशिनरीज ओनर असोसिएशन,  ऑल गोवा बार्ज ओनर असोसिएशन यांच्या अध्यक्षांची उपस्थिती होती. त्याचबरोबर खाणव्याप्त भागातील सरपंच, पंच सदस्यांनीही या सभेस उपस्थिती लावली. याप्रसंगी पिसुर्ले येथील टॅक मालक देवानंद परब म्हणाले की, 16 मार्चपासून खाणीवर अवलंबून असणा:या लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. गोव्यात खाणींचा व्यवसाय मोठा आहे. इतर कोणतीही मोठी औद्योगिक वसाहत एवढी मोठी नाही. हा व्यवसाय बंद झाल्यास लोक आत्महत्या करणार नाहीत, तर त्या धक्क्यानेच जीव गमावतील. राज्य सरकारने हवे असल्यास कायद्यात बदल करावा, त्याचबरोबर खाणी कशा सुरू राहतील यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. खाणींवर स्थानिकांबरोबरच इतर राज्यातील कामगारवर्गही मोठय़ा प्रमाणावर काम करीत असतो. या सभेला सर्व संघटनांनी आपापल्या कार्यक्षेत्रतील कामगारांनाही या सभेस आणण्यासाठी खासगी बसची किंवा इतर वाहनांची सोय केली आहे.