शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

गोव्यातील 89 खनिज लिजचं नूतनीकरण रद्द, खाण क्षेत्राला हादरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 12:18 IST

गोव्यात 2015 साली सरकारने घाईघाईत केलेले 89 खनिज लिजचं दुसरं नूतनीकरण सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिलेल्या निर्णयानंतर रद्द करण्यात आले.

पणजी : गोव्यात 2015 साली सरकारने घाईघाईत केलेले 89 खनिज लिजचं दुसरं नूतनीकरण सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिलेल्या निर्णयानंतर रद्द करण्यात आले. येत्या दि. 15 मार्चपर्यंत गोव्यातील या 89 लिजशीसंबंधित सगळा खाण व्यवसाय बंद करा. तसंच संबंधित लिजधारकांनी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रलयाकडून नव्याने पर्यावरणीय दाखले (ईसी) घ्यावेत असे सर्वोच्च न्यायालयाने निवाडय़ाद्वारे स्पष्ट केले आहे. गोव्यातील खनिज खाण क्षेत्रला हा मोठा हादरा असल्याचे मानले जात आहे.केंद्र सरकार 2015 साली खनिज खाण विषयक एमएमडीआर कायदा दुरुस्त करत होते, त्यावेळीच घाईघाईत गोवा सरकारने त्या कायद्याला बगल देत म्हणजे केंद्राचा वटहुकूम जारी होण्यापूर्वीच 89 लिजचं नूतनीकरण केलं. वटहुकूम जारी होण्याच्या आदल्या दिवशी देखील काही लिजचं खाण खात्याने नूतनीकरण करून दिलं होतं. या नूतनीकरणावर त्यावेळी गोवा फाऊंडेशनने प्रचंड टीका केली होती. लिजचं नूतनीकरण न करता लिजचा लिलाव पुकारला असता तर गोवा सरकारच्या तिजोरीत प्रचंड निधी जमा झाला असता असे गोवा फाऊंडेशनने त्यावेळी म्हटले होते. मात्र सरकारने गोवा फाऊंडेशनला चुकीचे ठरविण्याचा प्रयत्न कायम केला. प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयाच्या बुधवारच्या निवाडय़ामुळे गोवा फाऊंडेशन संस्था कायद्याची लढाई जिंकली आहे.लिज नूतनीकरणाविरुद्ध गोवा फाऊंडेशन संस्था प्रथम मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात गेली होती. उच्च न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्यामुळे गोवा फाऊंडेशनने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. बरेच महिने या याचिकेवर दोन्ही बाजूंनी युक्तीवाद झाले. गोवा सरकारने लिज नूतनीकरण हे कायदेशीर पद्धतीने केले व लिज धोरणाच्या चौकटीत राहून केले असे गोवा सरकारच्या वकिलांचे म्हणणं होतं.गोव्यातील जवळजवळ सर्वच खाण कंपन्या सेकंड लिज रिनीवलच्या तरतुदीनुसार कार्यरत होत्या. त्या सर्वाचे लिज नूतनीकरण रद्द झाल्याने सर्व खाणींना काम बंद करावे लागेल. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी जो निवाडा दिला होता, त्या निवाडय़ाचा व कायद्याचा भंग करून गोवा सरकारने दुसरे लिज नूतनीकरण दिले होते हे आता स्पष्ट झाले आहे. कायद्याचा भंग करून ज्या खाण कंपन्यांना खनिज माल काढण्यास दिला गेला, त्यांच्याकडून सगळा महसुल वसुल करण्यासाठी चार्टर्ड अकाऊन्टंट्सच्या सहभागाने विशेष तपास पथक नेमले जावे, अशीही सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. लिजेस नव्याने देण्यासाठी सरकारला आता लिलाव पुकारावा लागेल.दरम्यान, क्लॉड अल्वारीस यांनी बुधवारी लोकमतशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला व सगळी लिजेस रद्द झाल्याचे नमूद केले. दुपारी दोन वाजल्यानंतर आपल्याला सगळा तपशील मिळेल. सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा हा गोवा फाऊंडेशनच्या बाजूने आहे असे ते म्हणाले.