शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पर्रीकर कामाविषयी सतर्क, भाजपाच्या आमदारांना भेटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 17:46 IST

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे घरात व्हिलचेअरवर बसलेले असतात पण ते त्यांच्या कामाविषयी सतर्क आहेत. ते घरातूनच शासकीय काम करतात. 

ठळक मुद्देमुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे घरात व्हिलचेअरवर बसलेले असतात पण ते त्यांच्या कामाविषयी सतर्क आहेत. ते घरातूनच शासकीय काम करतात. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे घरात व्हिलचेअरवर बसलेले असतात पण ते त्यांच्या कामाविषयी सतर्क आहेत. ते घरातूनच शासकीय काम करतात. मुख्यमंत्री गेल्या आठवड्यात म्हणजे इफ्फी संपल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक घेऊ पाहत होते. मात्र त्यांना ती घेता आली नाही.

पणजी - मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे घरात व्हिलचेअरवर बसलेले असतात पण ते त्यांच्या कामाविषयी सतर्क आहेत. ते घरातूनच शासकीय काम करतात. शनिवारी सायंकाळी साडेतीन वाजता मुख्यमंत्री प्रथमच भाजपाच्या सर्व आमदारांची करंजाळे येथील त्यांच्या खासगी निवासस्थानी बैठक घेणार आहेत.

पर्रीकर व्हीलचेअरवर असले तरी घरात ते फिरू शकतात पण घराबाहेर पडणे त्यांना तूर्त शक्य नाही. त्यामुळे ते पर्वरीतील सचिवालयातही येऊ शकत नाहीत. मुख्यमंत्र्यांचे ओएसडी उपेंद्र जोशी हे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी असतात. शिवाय एक अटेंडंट व एक नर्स असते, असे मुख्यमंत्र्यांना गेल्या काही दिवसांत प्रत्यक्ष भेटलेल्या व्यक्तींनी लोकमतला सांगितले. पर्रीकर यांना कोणती फाईल निकालात काढायची आहे व कोणत्या फाईलवर काय निर्णय घ्यायचा आहे ते ठाऊक असते. बोलताना त्यांची विनोद बुद्धीही डोके वर काढते. ते काहीवेळा ज्योक्सही करतात आणि टीव्हीही अनेकदा पाहतात. पर्रीकर शरीराने थकलेले असल्याने फाईलवरील त्यांची सही वेगळी भासते. 

मुख्यमंत्री गेल्या आठवड्यात म्हणजे इफ्फी संपल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक घेऊ पाहत होते. मात्र त्यांना ती घेता आली नाही. एक मंत्री विदेशात असल्याने मंत्रिमंडळ बैठक घेतली गेली नाही, असे सांगितले जाते. भाजापच्या सर्व आमदारांना पर्रीकर अलिकडे आपल्या खासगी निवासस्थानी भेटले नव्हते. शनिवारी आमदारांना बोलविण्यात आले आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री अनेक सरकारी अधिकाऱ्यांची बैठक घेतील. प्रशासन ठप्प झाल्याची टीका काही मंत्री, आमदार सातत्याने करत असल्याच्या पार्श्वभूमीवर या बैठका होत आहेत.

मुख्यमंत्र्यांना दोन दिवसांपूर्वी मंत्री विजय सरदेसाई भेटले. तासभर सरदेसाई मुख्यमंत्र्यांशी बोलले. सरदेसाई यांनी लोकमतला सांगितले, की आपण भेटलो तेव्हा पर्रीकर टीव्हीवर इंग्रजी सिनेमा पाहत होते. काही प्रशासकीय कामांविषयी मी पर्रीकरांशी बोललो. ते मला बौद्धीकदृष्टय़ा तरी चांगल्या स्थितीत दिसले. ते घरातूनच काम करत असल्याने विद्यमान मुख्यमंत्री बदलला जावा ही मागणी मला योग्य वाटत नाही. मुख्यमंत्री बदलाचा प्रश्न येत नाही. माझा पक्ष तरी दुस:या कोणत्या पक्षासोबत जाणार नाही, कारण पर्रीकर घरातून काम करतात.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवाBJPभाजपा