शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बुजूर्ग नेते विरोधात आणि नवे तरुण सत्तेच्या खुर्चीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 20:33 IST

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सोमवारी सुरू झाले. विधानसभा सभागृहात प्रथमच खूप वेगळे चित्र अनुभवास आले.

- सदगुरू पाटीलपणजी : गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सोमवारी सुरू झाले. विधानसभा सभागृहात प्रथमच खूप वेगळे चित्र अनुभवास आले. सगळे बुजूर्ग नेते, कालपरवार्पयत जे मंत्रीपदी होते असे अनभिषीक्त सम्राट आणि सगळे माजी मुख्यमंत्री हे विरोधी बाकांवर बसले आहेत, आणि ज्यांना कालपरवाचे बच्चे आमदार म्हटले जात होते, असे बहुतेक आमदार चक्क मंत्री व उपमुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान झालेले आहेत असे चित्र पूर्ण गोव्याने पाहिले.सभापती महाशय, चर्चिल आलेमाव सुरुवातीलाच बोलत उभे राहिले. तुम्ही उत्तर देत रहावे, अनेकजण आज खूप आवाज करतील, असा सल्ला चर्चिलने दिला. हे वाक्य चर्चिलने चक्क हिंदीत उच्चरले. चर्चिलने कुणाचे नाव घेतले नाही पण आता विजय सरदेसाई, रोहन खंवटे, सुदिन ढवळीकर वगैरे सगळे रथी-महारथी विरोधात असल्याने ते बराच आवाज करतील, पण तुम्ही उत्तरे देत रहावे, असे चर्चिल सूचित करत होते. चर्चिलची हिंदी ऐकून मंत्री माविन गुदिन्होही हसले. सोमवारचा विधानसभेचा पहिला दिवस. वीस दिवसांचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले. कालपरवा जे मंत्री होते, आणि सत्तेच्या चाव्या कमरेला लावून फिरत होते, ते आता सभागृहात विरोधी बाकांवर आहेत आणि बाबू कवळेकरांसारखे आमदार उपमुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले आहेत, असे चित्र पहायला मिळाले. सकाळी साडेअकरा वाजता अधिवेशन सुरू झाले.गोवा फॉरवर्डचे तिन्ही आमदार सरदेसाई, जयेश साळगावकर आणि विनोद पालयेकर यांनी सभागृहात बारा मिनिटे उशिरा प्रवेश केला. अगोदर तिघांच्या खुच्र्या सभागृहात रिकाम्या होत्या. काँग्रेसचे प्रतापसिंग राणोही सतरा मिनिटे उशिराच आले. काँग्रेसकडे मुळात पाचच आमदार आहेत आणि एक आमदार उशिरा आल्याने केवळ चारच आमदार प्रारंभी सभागृहात दिसत होते. विरोधी पक्षनेत्याची खुर्ची रिकामी. सर्वप्रथम दिगंबर कामत सभागृहात आले, तेव्हा कामकाज सुरू झाले नव्हते. कामत यांनी मोठय़ाने मायकल लोबो यांना हाक मारली. लोबो आयुष्यात प्रथमच मंत्री झाल्याने खूप खूषित होते. तुम्हाला विज्ञान व तंत्रज्ञान खाते देणार असे मुख्यमंत्र्यांनी लोबोंना अगोदरच सांगितले होते व त्यामुळे ते अधिक खूषित होते. कामत यांनी हाक मारताच लोबो पुढे गेले. दिगंबर कामतांनी त्यांना शेक हँड केले. मगोपचे सुदिन ढवळीकरही एकटेच येऊन अगोदर विरोधी बाजूच्या खुर्चीवर बसले होते. एरव्ही सुदिन उपमुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सावंत यांच्या बाजूच्या खुर्चीवर ते बसायचे. आज त्या खुर्चीवर येऊन बाबू कवळेकर बसले होते. मंत्री बाबू आजगावकर आले व त्यांनी सुदिनच्या समोरच रवी नाईक यांना हात दिला. ढवळीकर तेव्हा खाली मान घालून शांत राहीले. रवी व आजगावकर या दोघांशीही ढवळीकरांचे पटत नाही. ते एकमेकांशी बोलणो टाळतात. शेवटी पर्वरीचे आमदार रोहन खंवटे आत आले. कालपरवार्पयत खंवटे हे वजनदार मंत्री होते. आयटी, महसुल या खात्यांचे ते अनभिषिक्त सम्राट होते. सोमवारी ते आमदार या नात्याने सभागृहात शांत येऊन बसले.नव्या महसुल मंत्री जेनिफर मोन्सेरात मात्र अगदी चकाचक कपडे परिधान करून सत्ताधा-यांसाठी असलेल्या खुर्चीवर बसल्या होत्या. त्यांचे पती बाबूश मोन्सेरात हे काँग्रेसच्या आमदारांसाठी ज्या बाजूने खुच्र्या असतात, त्या बाजूने बसले होते. अर्थात बाबूशही सत्ताधारीच पण ते फक्त आमदार आहेत. बाबूशने एखादा प्रश्न आयटी किंवा महसुल खात्याला विचारला तर जेनिफर उत्तर देतील. सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर थोडे आरामात राणो आत आले. समोर सत्ताधा:यांच्या खुर्चीवर मंत्री विश्वजित राणो बसले होते. त्यांनी आपले वडील राणो यांच्याकडे पाहिले. विश्वजितच्या चेह:यावर थोडी चिंता होती. चिंता यासाठी- कारण त्यांचे कायदा खाते काढून पुन्हा निलेश काब्राल यांच्या ताब्यात दिले जात असल्याची कल्पना त्यांना आली होती. गोवा फॉरवर्डचे तिन्ही सम्राट थोडे उशिरा सभागृहात का आले ते कुणालाच कळले नाही. रवी नाईक, दिगंबर, लुईङिान, सुदिन, विजय, रोहन असे सगळे विरोधी बाकांवर बसले आहेत आणि जेनिफर, लोबो,  विश्वजित, कवळेकर, नेरी असे थोडे बच्चे वाटणारे नेते चक्क मंत्री व उपमुख्यमंत्री होऊन थाटात विराजमान झालेले आहेत असे चित्र सभागृहाने अनुभवले. मार्च 2क्17 मध्ये र्पीकरांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार अधिकारावर आल्यानंतर असे चित्र कधी सभागृहात दिसले नव्हते. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे नवे असले तरी, त्यांनी अगदी उत्तम प्रकारे सर्व आमदारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. आपला तोल कुठेच जाऊ न देता मुख्यमंत्र्यांनी सुदिन ढवळीकर, रवी नाईक, लुईङिान, इजिदोर यांना सर्वच प्रश्नांवर अगदी व्यवस्थित ती माहिती व उत्तरे दिली. मुख्यमंत्री सभागृहात आले तेव्हाच, त्यांच्या खुर्चीसमोरील छोटय़ा टेबलवर  लॅपटॉप होता. ढवळीकर प्रश्न विचारू लागले. मी मोपा विमानतळाविषयी प्रश्न सादर केलेला आहे पण मी तो विचारत नाही, कारण त्या प्रश्नाच्या अनुषंगाने उत्तरात सरकारने जो करार सादर केला आहे, त्या कराराची पाने तीनशे आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी ती पाने वाचलेलीही नसतील, असे सुदिनरावांनी नमूद केले. विचारा, विचारा तुम्ही, मी सगळे वाचले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी ऐकवले. वॉटर रिसोर्सिस मंत्री कोण आहेत असे सुदिनने जोरात विचारले. एप्रिल महिन्यात कधी मान्सून सुरू होतो काय? मला जलंसाधन खात्याच्या मंत्र्याने एप्रिलमध्ये मान्सून सुरू होतो असे उत्तर दिले आहे, असे ढवळीकरांनी सांगताच सभागृहात थोडी हास्याची ढगफुटी झाली. इथे विद्यार्थी वगैरे आहेत. समोर प्रेक्षक गॅलरीत हायस्कुलची मुले बसतात, याचा उल्लेख करत सुदिन बोलले. व्यवस्थित माहिती द्यायला हवी, कोण तो जलसंसाधन मंत्री, ढवळीकरांनी पुन्हा विचारले. मुख्यमंत्र्यांनी तोर्पयत खाते वाटप केलेले नव्हते व मावळते जलसंसाधन मंत्री विनोद पालयेकर सभागृहात पोहचले नव्हते. लोबोंनी त्यावर काही तरी टोमणा मारला आणि बाकीचे मंत्री हसले. उत्तरात काही चुक झालेली असेल तर सरकार ती दुरुस्त करील, एवढेच मुख्यमंत्री सावंत यांनी सांगून वेळ मारून नेली.सभापती महाशय, माङया नावेली मतदारसंघातील काही भागांमध्ये पुर आल्याने मी सभागृहात थोडा उशिरा पोहचलो, असे लुईङिान फालेरो यांनी सांगितले. सरकारने काही तरी करायला हवे असे फालेरोंनी सूचवले. नोकर भरतीविषयी सुदिनने प्रश्न विचारले. नोक:या खूप पारदर्शक पद्धतीने भरायला हव्यात, एकदम गुणी अशा व्यक्तींना नोक:या मिळायला हव्यात, माङया मतदारसंघातील 23 डीग्री इंजिनिअर्स अगदी एलडीसीच्या पदाला देखील अर्ज करतात, असे फालेरो यांनी सांगितले. काँग्रेस पक्षाचे सरकार अधिकारावर होते तेव्हा गुण व मेरिट पाहून नोक-या दिल्या जात होत्या काय कोण जाणो. कदाचित चर्चिल आलेमाव वगैरे त्याविषयी जास्त माहिती देऊ शकतील. आम्ही गुणीच व्यक्तींना नोक-या देणार व प्रक्रिया पारदर्शकच असेल असे मुख्यमंत्री सावंत यांनी नमूद केले. म्हणजे नोक:या विकल्या जाणार नाहीत असे ते सूचित करत होते. चांगले लोक प्रशासनात आले,तरच प्रशासन चांगले चालेल. अशा प्रकारचे अगदी आदर्श विचार मुख्यमंत्र्यांनी मांडले. मग मुख्यमंत्र्यांनी एक मोठा अनुभव सांगितला. आपण जेव्हा आमदार होतो व अॅलिना साल्ढाणा जेव्हा मंत्री होत्या, तेव्हा आपण प्यूनाची नोकरी आपल्या मतदारसंघातीलही व्यक्तींना दिली जावी म्हणून साल्ढाणा यांच्याकडे गेलो होतो. त्यावर साल्ढाणा यांनी दिलेली माहिती ऐकून आपण थक्क झालो. प्यूनाच्या पदासाठी एलएलबी शिक्षित एका तरुणाने अर्ज केला असल्याची माहिती साल्ढाणा यांनी दिली होती. यावरून गोव्यातील शिक्षणाचीही अवस्था कळून येते, असा शेरा मुख्यमंत्र्यांनी मारला. तुम्हा सर्व आमदारांचीही एक जबाबदारी आहे. तुम्ही कुणाला सरकारीच नोकरी देणार असे सांगू नका, खासगी उद्योगांमध्ये नोकरीला चला किंवा स्वयंरोजगाराच्या मार्गावर चला असा सल्ला तुम्ही तरुणांना द्या, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी फालेरो व इतरांना दिला. प्रतापसिंग राणो शांतपणो ऐकत होते. कारण राणो मुख्यमंत्रीपदी असताना लोकांना गाई वगैरे घेऊन दुधाच्या व्यवसायात जाण्याचा सल्ला देत होते. ढवळीकरांनी नोकर भरतीविषयी प्रश्न विचारला होता व मुख्यमंत्री सावंत त्यांना व्यवस्थित उत्तर देत होते. मध्येच गोविंद गावडे उत्तर देण्यासाठी उठू लागले, त्यास सुदिनने आक्षेप घेतला, मला मंत्र्याकडून उत्तर नको, कारण माझा प्रश्न मुख्यमंत्र्यांसाठी आहे असे सांगत ढवळीकरांनी गोविंद गावडेना रोखले. एवढय़ात रवी नाईक उभे राहिले. मुख्यमंत्री खूप वेळ बोलतात, खूप वेळ उत्तर देतात, त्यांना जो प्रश्न विचारलेलाच नाही, त्या प्रश्नाला ते उत्तर देतात, असे रवी बोलू लागले. एवढय़ात सर्वानीच रवींना सांगितले की- सुदिनने जो प्रश्न विचारलेला आहे, त्याच प्रश्नाला मुख्यमंत्री उत्तर देत आहेत, ते भलतेसलते काही बोलत नाहीत. यामुळे रवी गार झाले व ढवळीकर आपल्या तोंडावर हात ठेवून हसू आवरू लागले.

टॅग्स :goaगोवा