शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर स्क्रॅप याडला लागलेली आग आटोक्यात

By आप्पा बुवा | Updated: May 7, 2023 17:20 IST

आग एवढी मोठी होती की तिथे दाखल  झालेले पाण्याचे प्रत्येक बंब कमी पडू लागले होते.

शुक्रवारी दुपारी ढवळी येथील स्क्रॅपयार्डला लागलेली आग शनिवारी रात्री उशिरा आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश आले असून अग्निशामक दलाने केलेल्या कामाचे कौतुक नागरिक करत आहेत. जरी आग आटोक्यात आली असली तरी सुरक्षेच्या कारणास्तव दोन बंब मात्र घटनास्थळी अजून ठेवण्यात आले असल्याची माहिती फोंडा अग्निशामक दलाचे अधिकारी सुशील मोरजकर यांनी दिली आहे.

सविस्तर वृत्तानुसार ढवळी येथील स्क्रॅप ला शुक्रवारी अचानक आग लागली. स्क्रॅपमध्ये मोठ्या प्रमाणावर रासायनिक पदार्थ असलेले बॅरल्स वगैरे तत्सम वस्तू असल्याने, तसेच दुपारची वेळ असल्याने आगीने लगेचच रौद्ररूप घेतले व संपूर्ण स्क्रॅपयार्ड आगीच्या विळख्यात सापडले.  सदरची आग शमवण्यासाठी गोव्यातील सगळ्या अग्निशामक दलाचे बंब वापरण्यात आले. हायड्रोलिक क्रेनचा सुद्धा वापर करण्यात आला.

लाखो लिटर पाणी लागले

आग एवढी मोठी होती की तिथे दाखल  झालेले पाण्याचे प्रत्येक बंब कमी पडू लागले होते. अग्निशामक दलाचे बंब सातत्याने ढवळीच्या दिशेने कुच करत असल्याचे चित्र त्यादिवशी दिसले. 13 बंब पहिल्याच दिवशी वापरण्यात आले होते. त्याबरोबर शेकडो लेटर फॉम सुद्धा वापरण्यात आला. हायड्रोलिक क्रेनच्या सहाय्याने सुद्धा आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न झाले. शनिवारी दिवसभर बुलडोझरच्या सहाय्याने पत्रे हटवून आग लागू नये म्हणून अग्निशामक दलाने प्रयत्न केले. त्या प्रयत्नांना शनिवारी रात्री उशिरा यश आले व आग आटोक्यात आणण्यात आले. काही ठिकाणी अजूनही सुप्त प्रमाणात आग दुमसत असल्याचे चित्र दिसत आहे. परंतु आग्निशामक दलाचे जवान परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.

असे अधिकारी हवेत 

ज्यावेळी सदर स्क्रॅप यार्डला आग लागली त्यावेळी आग चारीही बाजूने पटत होती. चारही बाजूने अग्निशामक दलाचे जवान आग विझवण्यासाठी प्रयत्न करत होते. पेट्रोल पंचा सहाय्याने पेट्रोल पंपच्या बाजूला आग पसरू नये म्हणून जवानाची एक तुकडी खास लक्ष ठेवून होती. ह्या तुकडीचे नेतृत्व फोंडा कार्यालयाचे अधिकारी सुशील मोरजकर हे करत होते. ह्या युवा अधिकाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. कारण आपल्या जवानांना पुढे न करता धोकादायक ठिकाणी जीवाची पर्वा न करता सुशील  वर चढलेला लोकांनी पाहिला. तिथे आत सिलेंडर होते, त्याच बरोबर लहान मोठे स्फोट होत होते. एखादा लहानसा स्फोट झाला असता तर ज्या भिंतीच्या सहाय्याने सुशील मोरजकर उभे होते ती भिंत त्यांना घेऊन पडू शकली असती. परंतु जीवाची पर्वा न करता सुशील,आगीला सहाय्य करणारे प्लास्टिकचे लहान पाईपचे तुकडे काढण्यात मग्न झाला होता. त्याच्या  खाली त्याचे जवान पाण्याचा फवारा मारून त्याला तेवढेच सहकार्य करत राहिले. थोडक्यात जवानांना पुढे न करता स्वतः सर्वात पुढे राहून काम करणारा अधिकारी मिळणे विरळच. लोकमत च्या कॅमेर्‍यात त्याचे हे धाडस टिपले गेले आहे.

टॅग्स :fireआगgoaगोवा