शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पर्रीकरांनंतर मुख्यमंत्री कोण?, अमित शहा यांच्याकडून तीन नावांवर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 15:09 IST

मनोहर पर्रीकर मुख्यमंत्रिपदी असले तरी, ते आजारी असल्याने नवा मुख्यमंत्री यापुढे नेमला जाईल, पण तो नवा मुख्यमंत्री कोण असावा याविषयी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मंत्री विजय सरदेसाई व इतरांशी गुरुवारी दिल्लीत चर्चा केली.

पणजी : मनोहर पर्रीकर मुख्यमंत्रिपदी असले तरी, ते आजारी असल्याने नवा मुख्यमंत्री यापुढे नेमला जाईल, पण तो नवा मुख्यमंत्री कोण असावा याविषयी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मंत्री विजय सरदेसाई व इतरांशी गुरुवारी दिल्लीत चर्चा केली. विनय तेंडुलकर, प्रमोद सावंत, विश्वजित राणे यांची नावे प्रामुख्याने भावी मुख्यमंत्री म्हणून चर्चेस आली. शहा हे गोवा फॉरवर्डचे नेते तथा कृषी मंत्री सरदेसाई, बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर आणि आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांना स्वतंत्रपणे भेटले. सभापती प्रमोद सावंत हेही दिल्लीत दाखल झाले आहेत.पर्रीकर आजारी असल्याने सरकारसाठी नवा नेता शोधावाच लागेल. त्यामुळे त्याच दृष्टिकोनातून शहा यांनी सरदेसाई यांच्याशी चर्चा केली. स्वत: सरदेसाई यांनी दिल्लीतील बैठकीनंतर लोकमतशी बोलताना वृत्ताला दुजोरा दिला. भाजपप्रणीत आघाडी सरकार गोव्यात कायम राहायला हवे व ते राहीलच, अशी ग्वाही शहा यांनी आपल्याला दिली. गोवा सरकारच्या स्थिरतेची हमी शहा यांनी आपल्याला दिली. भावी मुख्यमंत्री म्हणून काही नावांविषयी शहा यांनी माझ्याशी चर्चा केली. ती नावे मी उघड करू शकत नाही. मात्र गोवा सरकारच्या नेतृत्वाचा विषय शहा यांनी गंभीरपणे घेतला आहे. ते योग्य तो उपाय काढतील. सरकार कालावधी पूर्ण करील, असे मंत्री सरदेसाई म्हणाले.गोमंतकीयांच्या सध्याच्या राजकीय स्थितीत काय अपेक्षा आहेत हे मी शहा यांना सांगितल्याचे सरदेसाई यांनी नमूद केले.मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत विश्वजित यांच्यासोबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर हेही आहेत. त्यांचेही नाव चर्चेत आले. सभापती सावंत हे साखळी मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले आहेत. त्यांचेही नाव शहा व मंत्री सरदेसाई यांच्यातील चर्चेवेळी चर्चेस आले. मंत्री विश्वजित यांच्याविषयीही शहा यांनी चर्चा केली. निर्णय कोणताच झालेला नाही. प्रमोद सावंत यांना तातडीने मुख्यमंत्री पर्रीकर यांनीच गोव्याहून दिल्लीला पाठवले असल्याचे भाजपच्या अंतर्गत गोटात बोलले जात आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शाह