शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पर्रीकरांचं पार्थिव ठेवल्यानं कला अकादमीचं 'शुद्धीकरण'?; राज्यभरातून निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 07:40 IST

जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी

पणजी: माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचं पार्थिव ठेवण्यात आलेल्या कला अकादमीचं शुद्धीकरण करण्यात आल्यानं मोठा वाद निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या या कृतीचा राज्यभरातून निषेध करण्यात आला आहे. ही कृती म्हणजे पर्रीकर यांच्या स्मृतीचा उपमर्द तर आहेच, इतकेच नव्हे तर राज्य सरकारचं कला आणि संस्कृती खातं धार्मिक विकृतीच्या आहारी जात असल्याच्या प्रतिक्रिया राज्यभरात उमटू लागल्या आहेत.मनोहर पर्रीकर यांचं 17 मार्चला निधन झालं. त्यांच्यावर 18 मार्चला शासकीय इमतामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याआधी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी पणजीतील कला अकादमीत ठेवण्यात आलं होतं. या अकादमीचं शुद्धीकरण करण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे. काही ब्राह्मणांनी गोमूत्र शिंपडल्यानंतर संकुल 'पवित्र' झाल्याचं जाहीर केलं. यावेळी कला अकादमीचे सदस्य सचिव गुरुदास पिळर्णकर ब्राह्मणांसोबत होते. त्यांना याबद्दल विचारलं असता, त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. मात्र त्यांच्यासोबत असलेल्या कामत नामक कर्मचाऱ्यानं या प्रकाराचे आयोजन 'आम्ही' केलं आहे, असं उत्तर दिलं. 'आम्ही' म्हणजे कला अकादमीनं की कुणा व्यक्तीनं, असा प्रतिप्रश्न केला असता त्यांनी उत्तर न देता तेथून जाणं पसंत केलं. या संदर्भात कला अकादमीचे अध्यक्ष आणि कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितलं की, कला अकदमीत होम करण्यासाठी आपल्याकडे विचारणा करण्यात आली होती. मात्र नेमकं काय झालं याची कल्पना मला नाही. या घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याची माहिती गावडे यांनी दिली. या प्रकारावरुन राज्यभरातून प्रशासनावर टीका होत आहे. हाच न्याय लावायचा असेल, तर पुण्यातील साहित्य परिषद, टिळक स्मारक, एस. एम. जोशी सभागृह यांचं रोजच शुद्धीकरण करावं लागेल, अशी टिप्पणी पत्रकार चिंतामण पत्की यांनी केली. कला अकादमीचा प्रतिगामी आणि सनातनी चेहरा या प्रकारातून पुढे आला असून त्याला जबाबदार असलेल्यांवर त्वरित कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. 

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा