शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

प्रेमात दुरावा आल्याने प्रेयसीला पाण्यात बुडवून ठार मारून नंतर स्वत: केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 10:40 PM

निष्कर्षाप्रर्यंत पोलीस येऊन पोहोचले असून, खून म्हणून त्या युवतीचे मृत्यूप्रकरण पोलिसांनी नोंदवून घेतले आहे. दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांनी ही माहिती दिली.

मडगाव : प्रेमात दुरावा निर्माण झाल्यानंतर आपल्या प्रेयसीला पाण्यात बुडवून ठार मारून नंतर स्वतः आत्महत्या करण्याची घटना गोव्यात घडली. काल रविवारी ही घटना घडली होती. आज सोमवारी त्या युवतीच्या मृतदेहाची शवचिकित्सा केली असता, तिच्या गळ्याभोवती जखमा आढळून आल्या. तिला जबरदस्तीने पाण्यात बुडवून नंतर ठार मारले या निष्कर्षाप्रर्यंत पोलीस येऊन पोहोचले असून, खून म्हणून त्या युवतीचे मृत्यूप्रकरण पोलिसांनी नोंदवून घेतले आहे. दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांनी ही माहिती दिली.काल रविवारी राज्यातील दक्षिण गोव्यातील खड्डे — पाडी येथे एका ओहोळात याच भागातील अनिशा वेळीप ही युवती निपचित सापडली होती. तर मागाहून कावरे येथे एका झाडाला गळफास लावून सर्वेश गावकर (२३) या युवकाने आत्महत्या केली होती. अनिशा व सर्वेशचे दोन वर्षांपासून प्रेम प्रकरण होते. मात्र मध्यंतरी त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. अनिशा आपल्यापासून दूर गेल्याने सर्वेशच्या मनात संशय निर्माण झाला होता. रविवारी त्याने अनिशा राहत असलेल्या ठिकाणी जाऊन कपडे धुण्यासाठी ती गेली असता, तिला पाण्यात बुडवून ठार मारले व नंतर स्वत: आपल्या गावी जाऊन आत्महत्या केली.अनिशाच्या आईने ओहोळापाशी सर्वेशला बघितले होते. नंतर तो तेथून पळून गेला होता. पोलिसांना जेव्हा अनिशाच्या मृत्यूबदल कळाले व सर्वेशही तेथे होता असे समजल्यानंतर पोलिसांनी कावरे येथे त्याच्या घरी जाउन त्याचा शोध घेतला होता. मात्र तो सापडला नव्हते. नंतर घरापासून काही अंतरावर दूर एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह पोलिसांना सापडला होता.