शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांनंतर मंत्र्यांनीही सोडले सचिवालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 12:07 IST

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे त्यांच्या आजारपणामुळे मंत्रालय तथा सचिवालयात येऊ शकत नाहीत. मात्र त्यांच्या अनुपस्थितीमुळे प्रशासकीय कामाचा वेग एकदम कमी झाल्याने काही मंत्र्यांनी सचिवालयात येणेच बंद केले आहे.

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे त्यांच्या आजारपणामुळे मंत्रालय तथा सचिवालयात येऊ शकत नाहीत. मात्र त्यांच्या अनुपस्थितीमुळे प्रशासकीय कामाचा वेग एकदम कमी झाल्याने काही मंत्र्यांनी सचिवालयात येणेच बंद केले आहे. रोहन खंवटे, विजय सरदेसाई, विश्वजित राणे यांचे सचिवालय तथा मंत्रालयात येणे आता खूपच कमी झाले आहे. किंबहुना ते येतच नाहीत.

मंत्री खंवटे यांनी आपण प्रशासन ठप्प झाल्याचा व फाईल्स अधिकारी मंजूर करत नसल्याचा निषेध म्हणून मंत्रालयात येत नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र कृषी मंत्री विजय सरदेसाई हे देखील मंत्रालयात येतच नाहीत. सरदेसाई हे पूर्वी महिनाभर सचिवालय तथा मंत्रालयात आलेच नव्हते. चतुर्थीच्या काळात ते पुन्हा आले होते. पण नंतर त्यांनी मंत्रालयात येणे बंद केले. राज्य नियोजन मंडळाची बैठक घेण्यासाठी एकदा ते सचिवालयात आले होते. पत्रकारांनी नुकतेच मंत्री सरदेसाई यांना खंवटे यांच्याविषयी विचारले तेव्हा आम्ही तरी सचिवालयात कुठे येतो असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. अर्थात सरदेसाई यांनी मात्र कसलाच निषेध केलेला नाही ते सचिवालयात जास्त काम नसल्याने जास्त येत नाहीत.

आरोग्य मंत्री विश्वजित राणे हे पूर्वी दर बुधवारी सचिवालयात येत होते. कारण बुधवारी मंत्रिमंडळ बैठका व्हायच्या. तथापि, आता मुख्यमंत्रीही सचिवालयात पोहोचत नसल्याने आणि मंत्रिमंडळाच्या बैठकाही होत नसल्याने मंत्री राणे यांनीही सचिवालयात येणे थांबविले आहे. ते मिरामार येथील त्यांच्या निवासस्थानातून सगळे सरकारी काम करतात. सर्व फाईल्स तिथेच जातात व अधिका-यांच्या बैठकाही तिथेच होतात.

सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर, जलसंसाधन मंत्री विनोद पालयेकर, पर्यटन मंत्री बाबू आजगावकर व कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे हे नियमितपणो सचिवालयात जातात. यापैकी मंत्री साळगावकर हे न चुकता मंत्रलयात जात असतात. 

दरम्यान, भाजपाच्या प्रदेश कोअर टीमच्या सदस्यांनी नुकतीच महसूल मंत्री खंवटे यांची भेट घेतली व त्यांनी निषेध का पुकारला आहे हे जाणून घेतले. प्रशासन ठप्प झालेले असल्याचे खंवटे यांनी भाजपच्या कोअर टीमला सांगितले. मंत्र्यांना ज्या बदल्या हव्या असतात त्या देखील होत नाहीत हे खंवटे यांनी भाजपामसोर मांडले आहे.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवाBJPभाजपा