शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

एएफसीचे सामने गुरुवारपासून

By admin | Updated: September 12, 2016 03:51 IST

१५ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या १७ व्या १६ वर्षांखालील एएफसी फुटबॉल चषकातील सामने गोमंतकीयांना मोफत पाहता येणार आहे.

पणजी : येत्या १५ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या १७ व्या १६ वर्षांखालील एएफसी फुटबॉल चषकातील सामने गोमंतकीयांना मोफत पाहता येणार आहे. स्थानिक आयोजक समितीने यासाठी पुढाकार घेतला आहे. या स्पर्धेत एकूण १६ देशांतील संघ सहभागी होत आहेत. स्पर्धेतील सामने मडगाव येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम, बांबोळी येथील जीएमसी मैदानावर होतील. भारताचा पहिला सामना युएईविरुद्ध संध्याकाळी ७ वाजल्यापासून फातोर्डा स्टेडियमवर खेळविण्यात येईल. या सामन्यसाठी चाहत्यांना http://preprod.get2thegames.com/ या संकेतस्थळावरून नावनोंदणी करून तिकिटे मिळवावी लागतील. ही तिकिटे स्टेडिमय काउंटरवर मोफत असतील. या संदर्भात, स्पर्धा संचालक जेवियर सिप्पी म्हणाले की, आंतरराष्ट्रीय स्तरावरील ही स्पर्धा पाहण्यासाठी गोमंतकीय चाहते उत्साहीत असतील याची आम्हाला कल्पना आहे. त्यामुळे आम्ही मोफत सामने पाहण्याची सोय केली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आगामी २०१७ च्या विश्वचषकाची ही रंगीत तालीम असेल, त्यामुळे या स्पर्धेबाबतही उत्सुकता वाढावी, हा आमचा उद्देश आहे. यजमान भारतीय संघ या स्पर्धेत युएई, सौदी अरेबिया आणि इराणच्या गटात असून भारताचे सामने अनुक्रमे १५, १८ आणि २१ रोजी आहेत. या स्पर्धेसाठी प्रशिक्षक निकोलई अ‍ॅडम यांनी खूप मेहनत घेतली असून संघ आशावादी आहे. (क्रीडा प्रतिनिधी)भारतीय संघगोलरक्षक : धीरज सिंग, प्रभसुखन सिंग गिल, मोहम्मद नवाझ. बचावपटू : बोरीस सिंग थांगजाम, जितेंद्र सिंग, मोहम्मद सारिफ खान, मोहम्मद राकिप, गॅस्टन डिसिल्वा, नरेंदर.मध्यरक्षक : संजीव स्टॅलीन, सुरेश सिंग वांगजाम, खुमंथेम मितई, अमरजित सिंग कियाम, कोमल थाटल, अनिकेत अनिल जाधव, लालेंगमाविया, सौरभ मेहर. आक्रमक : अमन छेत्री, राहुल केन्नोळी प्रवीण, नोंगबा सिंग अकोजाम. स्पर्धेतील गटअ : भारत, इराण, सौदी अरेबिया, यूएई. ब : आॅस्ट्रेलिया, जपान, व्हिएतनाम, कझाकिस्तान.क : कोरिया प्रजासत्ताक, मलेशिया, ओमान, इराक. ड : डीपीआर कोरिया, उजबेकिस्तान, थायलंड व येमन.