भेसळयुक्त पदार्थांपासून दूर राहण्यासाठी अन्न औषधी प्रशासनाकडून ग्राहकांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 03:22 PM2024-03-17T15:22:19+5:302024-03-17T15:22:30+5:30

राज्यात काही जण पैशाच्या मोहापायी भेसळयुक्त बाजार करत असल्याने अन्न औषधी प्रशासन खात्याने ग्राहकांना काही सुचना केल्या आहेत.

Advice to consumers from the Food and Drug Administration to avoid adulterated foods | भेसळयुक्त पदार्थांपासून दूर राहण्यासाठी अन्न औषधी प्रशासनाकडून ग्राहकांना सूचना

भेसळयुक्त पदार्थांपासून दूर राहण्यासाठी अन्न औषधी प्रशासनाकडून ग्राहकांना सूचना

नारायण गावस

पणजी: राज्यात काही जण पैशाच्या मोहापायी भेसळयुक्त बाजार करत असल्याने अन्न औषधी प्रशासन खात्याने ग्राहकांना काही सुचना केल्या आहेत.  तसेच विविध खाद्य पदार्थ करणाऱ्या व्यापाऱ्यांनाही कडक सूचना केल्या असून त्यांच्याकडे भेसळयुक्त खाद्य मिळाल्यास  त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

अन्न आणि औषधी प्रशासन खात्याने भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे चिन्ह असलेले खाद्य पदार्थ खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच खाऊ गल्ली किंवा जत्रोत्सवात जे खाद्य पदार्थ करतात त्यांच्याकडून स्वच्छतेचे सर्व नियम पाळले जातात की नाही याची पाहणी करावी. पदार्थ तयार करताना त्यानी हातात हॅण्डग्लोज तसेच इतर स्वच्छता पाहावी. काेबी मन्चुरी तसेच चिकन तंदूरी सारख्या पदार्थात मोठ्या प्रमाणात नोन परमीटेड रंगाचा वापर केला जातो असे जास्त रंगाचा वापर केलेले पदार्थ न खाण्याचे आवाहन केले आहे.  तसेच थंड सरबत कॅण्डी मध्येही मोठ्या प्रमाणात असे भडक रंग वापरले जातात ते टाळावे.  तसेच सर्व खाद्य पदार्थाच्या पॅकेटवरील कालबाह्य तारीख पाहून पदार्थ खरेदी करण्याचे आवाहन केले आहे.

तसेच खाद्य पदार्थ तयार करणाऱ्यांनी नोन परमिटेट कलर वापरणे टाळावे असे आवाहन केले आहे. एकापेक्षा जास्त खाद्य रंग पदार्थात  मिश्रीत करु नये. शेव फरसान, मिठाई, केक बिस्कीट यामध्ये असे जास्त रंग न वापरण्याचे आवाहन केले आहे. तसेच गुळ, मासाले यामध्ये कुठलाच रंग मिसळू नये असेही म्हटले आहे.

Web Title: Advice to consumers from the Food and Drug Administration to avoid adulterated foods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.