शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

गाेवा क्रीडा प्राधिकरणात ५५ पदांसाठी जाहीरात; अर्ज 'या' तारखेपर्यंत करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 14:32 IST

गाेवा क्रीडा प्राधिकरण या गोवा सरकारच्या स्वायत्त संस्थेमध्ये नियमित तत्वावर गट ‘सी’ पदे भरण्यातीकरीता अर्ज मागविण्यात आले आहे. एकूण ५५ पदे भरली जाणार आहेत.

नारायण गावस

पणजी: गाेवा क्रीडा प्राधिकरण या गोवा सरकारच्या स्वायत्त संस्थेमध्ये नियमित तत्वावर गट ‘सी’ पदे भरण्यातीकरीता अर्ज मागविण्यात आले आहे. एकूण ५५ पदे भरली जाणार आहेत. यात सहाय्यक व्यवस्थापक (संकुल) १, सहाय्यक व्यवस्थापक (जलतरण तलाव) २, प्रशिक्षक ७, कनिष्ठ वर्ग लिपीक (एलडीसी) ४, प्रकल्प चालक २, जीवरक्षक १, बहुकार्मिक कर्मचारी ( मल्टिटास्किंग स्टाफ) ३८ अशी एकूण ५५ पदे भरली जाणार आहेत. या विविध पदांसाठी  एकूण १८,००० ते ३५,४०० पर्यंत वेतन दिले जाणार आहे.

प्रशिक्षक पदाकरता वय ३५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. सहाय्यक व्यवस्थापक (संकुल), सहाय्यक व्यवस्थापक (जलतरण तलाव), एलडीसी, प्रकल्प चालक, जीवरक्षक आणि एमटीएस याकरिता वय ४५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (गोवा क्रीडा प्राधिकरणच्या कर्मचाऱ्यांकरिता आणि शासकीय कर्मचाऱ्यांकरिता शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या सूचना आणि आदेशांना अनुसरून ५ वर्षांची शिथिलता).

आवश्यक पात्रता असणाऱ्या आणि पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज, सोबत जन्म प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र, रोजगार विनिमय पत्र, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, शिक्षणेतर क्रियाकलापप्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास) इ. यांच्या स्वसाक्षांकित प्रती जोडून कार्यकारी संचालक, गोवा क्रीडा प्राधिकरण, पहिला मजला, ॲथलेटिक स्टेडियम, कुजिरा, बांबोळी यांच्या कार्यालयात दि. १५ मार्च रोजी किंवा त्यापूर्वी सादर करावे. पदांची सविस्तर माहिती आणि कामाचा तपशील, अर्जाचा नमुना यासाठी कृपया एसएजी यांचे संकेतस्थळ : www.tsag.org_यास भेट द्यावी, असे गोवा क्रीडा प्राधिकरणातर्फे कळविण्यात आले आहे.