शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर गोव्याची बदनामी करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदवून कारवाई; रोहन खंवटे यांचा इशारा

By किशोर कुबल | Updated: December 14, 2023 15:24 IST

खंवटे म्हणाले की, पर्यटन स्थळ म्हणून गोव्यासमोर अनेक आव्हाने आहेत.

पणजी : सोशल मीडियावर गोव्याची बदनामी करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदवून कारवाई केली जाईल, असा इशारा पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिला आहे. 

गोवा हे कॅसिनो, वेश्या व्यवसाय, ड्रग्सचे ठिकाण असल्याचे व येथे वाईट प्रवृत्ती असल्याची बदनामी करणारे पोस्ट,  व्हिडिओ अलीकडे मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर टाकले जाऊ लागले आहेत. काहीजण पैसे घेऊन तर काही टीआरपी वाढवण्यासाठी हे कृत्य करीत असावेत. त्यांचा मी निषेध करतो, असे पर्यटनमंत्री म्हणाले.

अशा व्हिडिओंमुळे लोकांच्या भावना दुखावतात. खंवटे म्हणाले की, पर्यटन स्थळ म्हणून गोव्यासमोर अनेक आव्हाने आहेत. दलालांवर कारवाई करण्यासाठी कोणतीही कसूर सरकारने ठेवलेले नाही. १३६४ क्रमांकाच्या हेल्पलाइनवर तक्रार आल्यास तात्काळ कारवाई केली जाते. येत्या आठवड्यात 'बीच व्हिजिल ॲप' जनतेसाठी आम्ही खुले करणार आहोत. या ॲपवरही स्थानिक किंवा पर्यटक तक्रार करू शकतील व पोलीस तात्काळ कारवाई करतील आणि जर कारवाई केली नाही तर  संबंधित स्थानकाचा पोलीस अधिकारी जबाबदार राहील.' सलल मीडियावरील बदनामीच्या प्रकरणात आयटी कायद्याअंतर्गत कारवाई केली जाते. हा कायदा केंद्राचा आहे. आम्ही आमच्या सूचना केंद्राला पाठवलेल्या आहेत.

'किनारी भागात गस्तीसाठी पोलिसांची संख्या दुप्पट हवी'किनारी भागात गस्तीसाठी पोलिसांची संख्या दुप्पट करावी ,असे गेल्या आठवड्यात डीजीपींकडे मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत ठरले आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना तसे निर्देशही दिले आहेत. परंतु अजून किनाऱ्यांवरील  पोलिसांची संख्या वाढलेली नाही. ती का वाढली नाही?, हे तुम्ही डीजीपींनाच विचारा असे एका प्रश्नावर खंवटे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, पर्यटन खाते, पोलीस पर्यटकांना आवश्यक सुविधा सुरक्षा देण्यासाठी सर्व प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिस