लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : यंदाचा आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कार ‘गोवा लोकमत’चे संपादक राजू नायक यांना जाहीर झाला आहे. आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर व महाराष्ट्र साहित्य परिषद, सासवड यांच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. १३ जून रोजी अत्रे यांच्या पुण्यतिथीदिनी सासवड या त्यांच्या जन्मगावी या पुरस्काराचे वितरण होणार आहे.राजू नायक यांनी विविध मराठी व इंग्रजी वृत्तपत्रांत तब्बल ३० वर्षे पत्रकारिता केली आहे. पर्यावरणविषयक पत्रकारितेसाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून त्यात पर्यावरणविषयक दोन पुस्तकांचा समावेश आहे. गोव्याच्या खाण व्यवसायाचा पर्दाफाश करणारे ‘खंदक’ हे त्यांचे पुस्तक विशेष प्रसिद्ध आहे.
राजू नायक यांना आचार्य अत्रे पुरस्कार
By admin | Updated: May 30, 2017 03:59 IST