शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीने घरी सोडण्याचे सांगून अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 17:16 IST

बलात्कार करणाऱ्या ३३ वर्षीय तरुणाच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

लोकमत न्यूज नेटवर्कवास्को: रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला दुचाकीने घरी सोडण्याचे सांगून तिला अज्ञात स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी वेर्णा पोलीसांनी ३३ वर्षीय लक्षीमण बसप्पा लमाणी नामक तरुणाला अटक केली आहे. दोन दिवसापूर्वी त्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडल्यानंतर घाबरलेल्या मुलीने एक दिवस सोडून परिवाराला तिच्यावर घडलेल्या वाईट प्रसंगाची माहीती दिल्यानंतर परिवारातील सदस्यांने वेर्णा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली. पोलीसांनी त्या प्रकरणात त्वरित कारवाई करून गुरूवारी (दि.६) पहाटे ४ नंतर लक्षीमण लमाणी याला अटक केली.

वेर्णा पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार शाळेत शिकणाºया त्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन दिवसापूर्वी बलात्काराची घटना घडली. त्या दिवशी सकाळी ती मुलगी प्रथम एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाबरोबर घरातून पळून गेली होती अशी माहीती पोलीसांना प्राप्त झाली आहे. त्यानंतर त्याच दिवशी ती घरी परतली असता काही मुद्यावरून मुलीची घरातील काही सदस्यांबरोबर वाद निर्माण झाल्यानंतर ती पुन्हा घरातून बाहेर निघून गेली. त्यानंतर ती एका ठीकाणी रस्त्याच्या बाजूला उभी असता झुआरीनगर, साकवाळ येथे राहणारा ३३ वर्षीय लक्षीमण लमाणी नामक तरुण तिच्याशी गेला. त्यांने तिला दुचाकीवरून घरी पोचवणार असल्याचे सांगितल्यानंतर ती त्याच्याबरोबर दुचाकीवरून निघून गेली. लक्षीमण त्या अल्पवयीन मुलीला तिच्या घरी सोडण्याऐवजी तिला एका अज्ञात स्थळावर घेऊन गेला. तेथे त्यांने त्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याबरोबरच तिच्यावर बलात्कार केल्याची माहीती पोलीसांनी दिली.

बलात्कार केल्यानंतर लक्षीमणने त्या अल्पवयीन मुलीला घटनेबाबत कोणालाही सांगितल्यास जिवंत मारण्याची धमकी दिल्याचे पोलीसांनी सांगितले. बलात्कार करून जिवंत मारण्याची धमकी दिल्याने घाबरलेल्या मुलीने घरी परतल्यानंतर तिच्यावर घडलेल्या वाईट प्रसंगाची माहीती कोणालाच दिली नाही. दुसºया दिवशी तिने आपल्या परिवारातील सदस्यांना घडलेल्या वाईट प्रसंगाची माहीती दिल्यानंतर त्यांनी वेर्णा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली.

एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची माहीती पोलीसांना मिळताच त्यांनी त्वरित कारवाई करून बलात्कार करणाºया लक्षीमण लमाणी याला ताब्यात घेतला. तसेच त्याच्याविरुद्ध भादस ३६३, ३७६, ३५४ - ए, ५०६(२) कलमाखाली तसेच गोवा चिर्ल्डंन्स एक्ट च्या ८ (२) कलमाखाली आणि पोक्सो कायद्याच्या ४, ६, ८, १२ कलमाखाली गुन्हा नोंद करून त्याला गुरूवारी पहाटे ४ नंतर अटक केली. बलात्कार घडलेल्या दिवशी ती अल्पवयीन मुलगी तिच्या एका १७ वर्षीय मित्राबरोबर (मुलगा) घरातून पळून गेली होती अशी माहीती पोलीसांना मिळाल्याने पोलीस त्या अल्पवयीन मुलाशी विविध विषयांवर चौकशी करणार असल्याची माहीती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. वेर्णा पोलीस अधिक तपास करित आहेत. 

टॅग्स :Molestationविनयभंग