शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याचे २० मीटर उंचीच्या माडावर ठाण; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2023 18:51 IST

गीतेश वेरेकर सावईवेरे :     भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्याने फोंडा तालुक्यातील सावईवेरे येथील कुळण वाड्यावर भरवस्तीत शिरकाव करून ...

गीतेश वेरेकरसावईवेरे :    भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्याने फोंडा तालुक्यातील सावईवेरे येथील कुळण वाड्यावर भरवस्तीत शिरकाव करून सुमारे २० मीटर उंच माडावर ठाण मांडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.     कुळणवाडा हा कुळागरी भाग असल्याने येथे नसौर्गिक जलस्रोत आहेत. या वाड्याच्या मागील बाजूला रान असल्याने काल शनिवारी रात्रीच्या वेळी रानातून भुकेने व्याकुळ अथवा पाण्याच्या शोधात बिबट्या या वाड्यात शिरला असावा. परंतु  कुत्र्यांच्या भुंकण्याने किंवा कुत्र्यांनी पाठलाग केल्याने बिथरलेल्या बिबट्याने कुळण येथील अशोक सावईकर यांच्या घराशेजारील माडाचा आधार घेतला असावा. सकाळी ८ च्या सुमारास घरमालक बाहेर येताच त्यांच्या घराशेजारीच नारळ पडल्याचे त्यांना दिसले.त्यांनी सहज माडावर नजर टाकताच त्यांना बिबट्याचे दर्शन झाले व या कुटुंबातील सर्व मंडळींची तसेच आजूबाजूच्या घरातील मंडळींची घाबरगुंडी उडाली. याबाबतची माहिती तत्काळ वन विभागाला देण्यात आली. वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.यावेळी फोंड्याचे वन क्षेत्रपाल अधिकारी ( RFO) दीपक तांडेल यांनी माहिती देताना सांगितले की बिबट्या सुमारे दोन ते तीन वर्षांचा असून उंचावर असल्याने नर की मादी कळणे कठीण आहे. त्याला खाली आणणे शक्य नसल्याने हा बिबट्या आपोआप खाली येईपर्यंत वाट बघण्याखेरीज दुसरा कोणताही उपाय नाही. तरीही त्याला खाली आणण्यासाठी आमचे सहकारी प्रयत्नशील आहेत. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले.     बिबट्याचे दर्शन घेण्यासाठी व त्याचा फोटो  मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी बघ्यांची बरीच गर्दी जमली.सोशल मीडियावर बिबट्याचा फोटो व व्हिडिओ व्हायरल झाला. संध्याकाळी उशिरा ५ वाजेपर्यंत  या बिबट्याने खाली उतरण्याचे कोणतेही धाडस केले नाही.पहिल्यांदाच या भागात बिबट्याचे दर्शन झाले असल्याचे स्थानिकांनी सांगितले.या बिबट्याला माडावरून उतरवणार तरी कसे ? याचीच वाट स्थानिक लोक बघत आहेत.कदाचित रात्रीच्या वेळी खाली उतरेल असा अंदाज वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.

टॅग्स :leopardबिबट्या