शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

उपचारासाठी आलेल्या युवतीला टीशर्ट काढायला लावला, नंतर...; वृद्ध डॉक्टरकडून विनयभंग

By सूरज.नाईकपवार | Updated: August 19, 2023 10:59 IST

संशयिताने तिला टीर्शट काढण्यास सांगून तिच्या अंगाला हात लावण्यास सुरुवात केली होती. घाबरलेल्या त्या युवतीने नंतर पोलिस ठाण्यात येउन आपल्यावर झालेल्या अत्याचाराविरोधात तक्रार नोंदविली.

मडगाव: वैदयकीय क्षेत्राला काळिमा फासणारी एक घटना  गोव्यातील मडगाव येथे घडली असून, तपासणीसाठी क्लिनिकमध्ये आलेल्या एका सव्वीस वर्षीय युवतीचा डॉक्टरनेविनयभंग केला. डॉ. प्रकाश अवदी (७७) असे संशयित डॉक्टराचे नाव असून, आपली नात शोभणाऱ्या त्या युवतीवर त्याने आगळिक करण्याचे पापकृत्य केले.

या प्रकरणात पिडिताने मडगाव पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. भारतीय दंड संहितेंच्या ३५४ (अ) कलमाखाली पाेलिसांनी संशयित डॉक्टरावर गुन्हा नोंद केला आहे. पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दामोदर शिरोडकर पुढील तपास करीत आहेत.

पोलिस निरीक्षक नाईक यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी पोलिसांत तक्रार नोंद झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. पुढील तपास चालू असल्याची माहितीही त्यांनी दिली.डॉ. अवदी यांंचे मडगावात क्लिनीक आहे. बुधवार दि. १६ ऑगस्ट रोजी रात्री साडेनउच्या सुमारास ती युवती ताप आल्याने डॉक्टराकडे तपासणीसाठी गेली होती.यावेळी संशयिताने तिला टीर्शट काढण्यास सांगून तिच्या अंगाला हात लावण्यास सुरुवात केली होती. घाबरलेल्या त्या युवतीने नंतर पोलिस ठाण्यात येउन आपल्यावर झालेल्या अत्याचाराविरोधात तक्रार नोंदविली.

टॅग्स :Molestationविनयभंगdoctorडॉक्टर