शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

२ वर्षांचे मूल आईची नजर चुकवून रस्त्यावर धावले अन् गाडी खाली आले; प्रकृती गंभीर

By वासुदेव.पागी | Updated: March 5, 2024 16:21 IST

कचरावाहू गाडीचे चालक मल्लिकार्जून मिरागी याला जुने गोवा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे

पणजीः खोर्ली येथे रस्त्याने जाणाऱ्या कचरा वाहू गाडीच्या चाकाखाली २ वर्षे वयाचे मूल सापडल्यामुळे गंभीररित्या जखमी झाले आहे. आईच्या हातून सुटून हे मूल रस्त्यावर धावले होते. खोर्ली येथी ही हृदयद्रावक घटना घडली २ वर्षे वयाचा मुलगा आपल्या आईबरोबर दुकानात आला होता. आई दुकानात सामान खरेदी करण्यात व्यस्त असताना आईची नजर चुकवून मुलगा रस्त्यावर धांवला. त्याचवेळी रस्त्यावरून धावणाऱ्या टाटा एस या कचरावाहू गाडीखाली तो सापडला. वानचालकाने करकचून ब्रेक्स लावून गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत मुलगा चाकाखाली सापडला होता. तो गंभी रित्या जखमी झाला असून त्याला उपचारासाठी लगेच गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. संध्याकाळपर्यंत त्याची प्रकृती चिंताजनकच होती. 

या अपघाताच्या प्रकरणात कचरावाहू गाडीचे चालक मल्लिकार्जून मिरागी याला जुने गोवा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तसेच ते वाहनही ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान राज्यात दर दिवसा अपघात होत आहेत आणि अपघाती मृत्युही होत आहेत. खोर्ली येथील या दुर्दैवी अपघातानंतर धारगळ येथे महामार्गावरही अपघाती मृत्यु झाला. दुचाकीस्वाराला ठोकर देऊन अज्ञात वाहनचालकाने पळ काढला. ही ठोकर इतकी जोरदार होती की दुचाकी चालक संजय जळवी हा जागीच ठार झाला. तो सिंधुदुर्ग येथील आहे. पोलीस या प्रकरणात तपास करीत असून हीट अँड रन करणाऱ्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

टॅग्स :Accidentअपघातgoaगोवाhospitalहॉस्पिटल