शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 88 चालकांचे परवाने होणार निलंबित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 14:19 IST

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांवर रात्रीच्यावेळी केलेल्या कारवाईत 88 जणांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

पणजी : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांवर रात्रीच्यावेळी केलेल्या कारवाईत 88 जणांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या सर्वांचे परवाने 3 महिन्यांसाठी निलंबित करण्यात येणार आहेत. दिवसा व रात्रीच्या वेळीही सिग्नलचे संकेत न पाळणा-यांना पोलिसांनी लक्ष्य केले असून अचानक कारवाई करुन अशा चालकांना अडवून गुन्हा नोंदवण्याचा धडाका लावण्यात आला आहे. शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. त्यापूर्वी सकाळी पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी तसे पत्रक जारी करून अशी कारवाई होणार असल्याचे जाहीर केले होते. रात्रीच्यावेळी पोलिसांनी सिग्नलच्या ठिकाणी राहून तशी कारवाई सुरूही केली. राज्यात सर्व सिग्नल्सच्या ठिकाणी पोलीस उभे होते.

या कारवाईत राज्यभर मिळून 88 जणांना सिग्नलचे संकेत न पाळण्यासाठी पकडण्यात आले. तसेच त्यांच्यावर गुन्हे नोंदविण्यात आले. दंड व  चालक परवाना निलंबनाची शिफारस अशी दुहेरी  कारवाई करण्यात आली आहे. सर्व 88 चालकांचे परवाने वाहतूक खात्याकडे चालक परवाने रद्द करण्यासाठी पाठविले जाणार असल्याची माहिती पोलीसांनी दिली. चालू वर्षात अतापर्यंत 1403 जणांविरुद्ध वाहतूक सिग्नलचे संकेत न पाळण्यासाठी गुन्हे नोंदविण्यात आली आहेत. सर्वांविरुद्ध चालक परवाने निलंबनाची शिफारस करण्यात आली आहे. सिग्नल पाळल्या जात नसल्यामुळे अपघात घडतात  त्यामुळेच ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. केव्हाही कोणत्याहीवेळी आकस्मीक कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीस महासंचालकांनी दिली. 

टॅग्स :goaगोवाTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस