शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील 80 छोटे पुल नादुरुस्त, 50 टक्के ऑडिट पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 18:33 IST

राज्यातील पुलांच्या स्थिरतेविषयीचे ऑडिट करण्याचे काम सुरू आहे. उत्तर गोवा जिल्ह्यातील 80 छोटे पुल व साकव नादुरुस्त आहेत.

पणजी : राज्यातील पुलांच्या स्थिरतेविषयीचे ऑडिट करण्याचे काम सुरू आहे. उत्तर गोवा जिल्ह्यातील 80 छोटे पुल व साकव नादुरुस्त आहेत. ते नव्याने बांधणो तसेच काही पुल दुरुस्त करणो अशी कामे लवकरच सुरू केली जातील, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी मंगळवारी येथे पत्रकारांना सांगितले.तिस-या मांडवी पुलाशी निगडीत सोहळ्यापूर्वी बोलताना ढवळीकर म्हणाले, की पोर्तुगीजकालीन 80 पुल नादुरुस्त आहेत, असे ऑडिटवेळी आढळून आले. यापैकी काही छोटे पुल नव्यानेच बांधावे लागतील तर काही दुरुस्त करावे लागतील. दक्षिण गोवा जिल्ह्यातील पुलांचा अभ्यास अजून झालेला नाही. तो होण्यासाठी आणखी वर्षभराचा कालावधी लागेल. सावर्डेत एक छोटा पूल काही वर्षापूर्वी कोसळून बरेच जण पाण्यात पडल्यानंतर राज्यातील सर्वच पोर्तुगीजकालीन पुलांचे बांधकामविषयक ऑडिट करण्याचे काम सुरू झाले होते.मंत्री ढवळीकर म्हणाले, की राज्यातील काही महामार्गाचे रुंदीकरण व अन्य साधनसुविधांची कामे होण्यामध्ये काही राजकारणी व काही लोक अडथळे आणत आहेत. यामुळे कामे वेळेत पूर्ण होण्यास विलंब लागतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याही हे लक्षात आले आहे व त्यांनी त्याविषयी थोडी नाराजी व्यक्त केली. आम्ही सगळी कामे पूर्ण करू पण जर यापुढे राजकारण्यांनी किंवा लोकांनी एखाद्या प्रकल्पाला विरोधाचीच भूमिका घेतली तर ते काम केले जाणार नाही. काही ठिकाणी एखादे घर हलवावे लागले तरी, आक्षेप घेतला जातो. भू-संपादनाविषयीच्या अधिसूचना आम्ही जारी करत आहोत. कुणाचाही काही प्रश्न असेल तर त्यांनी माझ्या कार्यालयात येऊन समस्या मांडावी.दरम्यान, केंद्रीय मंत्री गडकरी यांनी मांडवी नदीवरील तिस-या पुलाच्या कामाची ढवळीकर व अन्य मंत्र्यांसोबत मंगळवारी पाहणी केली. जुवारी पुल व मांडवी पुल या दोन्ही पुलांच्या कामांसाठी चांगले कंत्रटदार गोव्याला लाभले आहेत. त्यामुळे ही कामे वेळेत पूर्ण होतील. मी अनेक प्रकल्प गोव्यात आणू पाहतो पण त्यासाठी येथील लोक व गोवा प्रशासनाचे सहकार्य हवे आहे. अन्यथा कंत्रटदार परत जातील.