शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

गोव्यात ऑर्किड पीक योजनेत घोटाळा; शेतकऱ्यांकडून मडगाव पोलिसात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 15:24 IST

21 शेतकऱ्यांनी रत्नाकर बँकेचे व्यवस्थापक तसेच गुजरातच्या प्राम ग्रीन हाऊस व सनबायो ऑर्गेनिक्स इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या संचालकांविरोधात मडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल  केली आहे.

मडगाव:  ऑर्किड फूलशेती प्रकरणात आपल्याला किमान आठ कोटींचा गंडा घातल्याचा आरोप करुन काणकोण व जवळपासच्या भागातील 21 शेतकऱ्यांनी रत्नाकर बँकेचे व्यवस्थापक तसेच गुजरातच्या प्राम ग्रीन हाऊस व सनबायो ऑर्गेनिक्स इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या संचालकांविरोधात मडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल  केली आहे. यासंबंधीचे निवेदन सोमवारी दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांना दिले. यासंदर्भात पोलिसांनी अद्याप कुणावरही एफआयआर नोंदविलेला नाही. मात्र या प्रकरणात सखोल तपास करुन फसवणुकीची बाब सापडल्यास आम्ही संबंधितांवर गुन्हा नोंद करुन कारवाई सुरु करु असे गावस यांनी सांगितले. 

मागच्या सरकारच्या काळात पॉली हाऊस मंजूर झालेल्या काणकोण, केपे व सांगे तालुक्यातील तब्बल 21 शेतक-यांनी सोमवारी गोवा फॉरवर्डच्या नेतृत्वाखाली दक्षिण गोव्याचे पोलिस अधिक्षक अरविंद गावस यांनी त्या प्रकरणात बँकेकडून येऊ लागलेल्या कर्ज वसुली प्रकरणानंतर हे तक्रारीचे निवेदन सादर केले.  सदर कर्ज मंजुरी व पॉली हाऊस उभारणीत मोठा घोटाळा असल्याचा आरोप करून या प्रकरणात चौकशी करावी व आपल्याला दिलासा दावा द्यावा अशी मागणी केली आहे. यावेळी पोलीस उपअधिक्षक राजू राऊत देसाई उपस्थित होते. गोवा फॉरवर्डचे प्रशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली सूरज नाईक गावकर व इतरांनी हे निवेदन पोलीस अधिक्षकांना सादर केले.

प्रशांत नाईक यांनी  नंतर पत्रकारांना सांगितले की, हा एकंदरच फार मेाठा घोटाळा असून त्यामुळे 21 शेतकरी अडचणीत आले असून त्यांना दिलासा मिळाला नाही तर त्यांच्यावर आत्महत्यांची पाळी आल्याशिवाय रहाणार नाही. कारण एकेकाच्या माथ्यावर 67 लाखांचे कर्ज असून बँकेने त्यांच्यावर मुंबईत खटले दाखल केलेले असून त्यांचा सामना करणे त्यांना शक्य होणार नाही.  त्यांनी या प्रकरणात बँक व बंगलोर मधील पॉली हाऊस ठेकेदार यांचे संगनमत असून त्यांनी शेतक-यांवर  ही पाळी आणल्याचा आरोप केला. आपण या प्रकरणात सरकार दरबारी तसेच कंत्राटदार व बँक अधिकारी यांच्या बैठका घेऊन पर्याय शेधण्याचा प्रयत्न केला. पण गेले वर्षभर या प्रकरणात काहीच होऊं शकले नाही.  या शेतक-यांनी लागवडी खालील जमिनीत पॉली हाऊस उभारले पण  ती निकृष्ट ठरली व अवघ्याच काळांत मोडकळीस आली, ती दुरुस्त करण्यास येथे तंत्रज्ञ नाहीत, त्यांनी चांगली बियाणी उपलब्ध न झाल्याने  ते तेथे लागवडही घेऊं शकले नाहीत व त्या मुळे उत्पन्नातून कर्ज फेडूं शकले नाहीत.  हे शेतकरी अजूनही एकरकमी  परतफेडीस तयार आहेत व त्यासाठी त्यांना व्याज माफ करायला हवे. हे एकंदर प्रकरण 420 कलमाखाली नोंद करावे अशी मागणी या तक्रारीत केली आहे, ते म्हणाले.

सूरज नाईक गावकर यांनी सांगितले की, या प्रकरणात बँकेने प्रत्येक शेतक-यांकडून पावणे दोन लाख रु. कर्ज प्रक्रिया शुल्क वसूल केले व नंतर ठेकेदाराला परस्पर 60 लाख रुपये चुकते केले सरकारी सबसिडीही परस्पर ठेकेदाराला कशी चुकती झाली, पॉली हाऊस दोन वर्षात कशी नष्ट झालीत,  असा सवाल करून त्यांतून हे शेतकरी हवालदिल झाल्याचे सांगितले.

 

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिस