शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

गोवा विधानसभा अधिवेशनासाठी 703 प्रश्न, 13 डिसेंबरपासून चार दिवसांचे कामकाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 20:05 IST

पणजी : राज्यात विधानसभा अधिवेशनास येत्या 13 डिसेंबरपासून आरंभ होत आहे. अधिवेशनातील कामकाज फक्त चार दिवसांचे असेल.

पणजी : राज्यात विधानसभा अधिवेशनास येत्या 13 डिसेंबरपासून आरंभ होत आहे. अधिवेशनातील कामकाज फक्त चार दिवसांचे असेल. राज्य विधिमंडळ कामकाज समितीच्या मंगळवारी येथे झालेल्या बैठकीत कामकाजाची रूपरेषा निश्चित करण्यात आली. एकूण 703 प्रश्न अधिवेशनात चर्चेसाठी येणार आहेत.सभापती डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आदींच्या सहभागाने विधिमंडळ कामकाज समितीची बैठक पार पडली. 18 डिसेंबरला अधिवेशनाचा समारोप होईल. शनिवार व रविवारी सुट्टी असल्याने फक्त चार दिवस कामकाज चालेल. 703 प्रश्न सादर झाले असून त्यात 242 तारांकित व 461 अतारांकित प्रश्नांचा समावेश आहे. चार सरकारी विधेयके व शुक्रवारी चार खासगी ठराव अधिवेशनात मांडले जाणार आहेत.दरम्यान, नगर नियोजन कायद्यात काही महत्त्वाच्या दुरुस्त्या करण्यासाठी येत्या अधिवेशनात दुरुस्ती विधेयक मांडले जाणार आहे. मंत्री विजय सरदेसाई यांनी या दुरुस्त्यांविषयी मंगळवारी येथे पत्रकारांना सांगितले, की गोमंतकीयांनी जर 250 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेत घर बांधले तर त्या घराच्या कामासाठी साधनसुविधा कर आकारला जाणार नाही. सध्या 10 चौरस मीटरच्या कामासाठी असा कर आकारला जात नाही. मात्र गोमंतकीय कोण याविषयीची व्याख्या नगर नियोजन कायद्यातील दुरुस्तीनुसार स्पष्ट केली जाणार आहे. जो अजर्दार असेल त्याचा आणि त्याच्या वडिलांचा जन्म गोव्यात झालेला असावा असे अपेक्षित आहे. तसेच 15 वर्षांचा रहिवासी दाखला असावा.मंत्री सरदेसाई म्हणाले, की नगर नियोजन कायद्याच्या कलम 49(6)नुसार सध्या कुणालाही पीडीएच्या क्षेत्रत येणा-या गावातील आपला भूखंड विकायचा असेल तर पीडीएची एनओसी गरजेची ठरते. याचप्रमाणे नव्या दुरुस्तीनुसार यापुढे पीडीए क्षेत्राखाली न येणा-या गावातील लोकांना देखील नगर नियोजन खात्याची एनओसी घ्यावी लागेल. सध्या कुणीही ऑर्चड जमिनीत भूखंड तयार करतात व विकतात. एकदा खात्याची एनओसी बंधनकारक झाली म्हणजे असे भूखंड विकता येणार नाहीत.मंत्री सरदेसाई म्हणाले, की कलम 16(अ) आणि 17(अ) हे देखील दुरुस्त केले जाईल. सध्या या कलमांचा भंग करणा-यांना 1 लाख रुपये दंडाची शिक्षा आहे. दंडाचे हे प्रमाण 10 लाख रुपये केले जाईल व त्याशिवाय दोषी व्यक्तीला एक वर्ष कैद भोगावी लागेल. सध्या एफआयआर नोंद करण्याची तरतूद आहे, पण तो सहसा कुणी करत नाही. फक्त एक लाख रुपये दंड ठोठावून विषय संपविला जातो. ह्या सगळ्या नव्या दुरुस्त्यांचे प्रस्ताव आज बुधवारी प्रथम मंत्रिमंडळ बैठकीसमोर ठेवले जातील.

टॅग्स :goaगोवा