शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील पोस्टमन हायटेक होणार; 700 कर्मचाऱ्यांच्या हातात स्मार्टफोन येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 14:56 IST

उद्यापासून गोव्यात पेमेन्ट बँक सुरू होणार

पणजी : गोव्यातील पोस्टमन आता स्मार्ट होणार आहेत. एकूण सातशे पोस्टमनांच्या हाती स्मार्ट फोन असतील. गोव्यातील ज्या लोकांची, विशेषत: महिलांची बँकेमध्ये अजूनही खाती नाहीत, असे लोक पोस्टात खाते उघडू शकतील. विशेष म्हणजे या खात्यातून ग्राहक पाच हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकतात. ही रक्कम त्यांना घरबसल्या काढता येईल. केंद्र सरकारने जनधन योजना राबवली, तरीही देशातील 20 कोटी जनता अद्यापही बँकिंग व्यवस्थेच्या बाहेर आहे.गोव्याचे पोस्ट मास्टर जनरल डॉ. एन. विनोदकुमार यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत इंडिया पोस्ट पेमेन्ट्स बँकविषयी माहिती दिली. येत्या 1 सप्टेंबरपासून ही बँक सुरू होत आहे. गोव्यातील पोस्टाच्या सहा शाखांमध्ये उद्यापासून ही बँक कार्यान्वीत होईल. गोव्यातील उर्वरित 257 पोस्ट कार्यालयांमध्ये ही बँक सेवा अॅक्सेस केंद्रांच्या रुपाने या वर्षाच्या अखेरपर्यंत सुरू होईल, असे डॉ. विनोदकुमार यांनी सांगितले. सध्या पोस्ट खात्याकडे 30 स्मार्ट फोन आहेत. येत्या डिसेंबरपर्यंत सर्व 700 पोस्टमनकडे स्मार्ट फोन असतील, असे विनोदकुमार म्हणाले. गेल्या तीन दिवसांत सुमारे 2 हजार गोमंतकीयांनी पोस्टात बँक खाती उघडली आहेत. त्यापैकी 90 टक्के व्यक्तींनी स्मार्ट फोनचा वापर करून खाती उघडली. गोव्यातील कुठल्याही भागातील पुरुष किंवा महिलेला जर स्मार्ट फोन नीट वापरता येत नसेल, तर पोस्टमन त्यासाठी त्यांना मदत करतील. पोस्टमधील खाते हे आधारकार्डावर आधारित असेल. त्यामुळे घोटाळा वगैरे होणार नाही, असे विनोदकुमार म्हणाले. 'खात्यात किमान रक्कम किती असावी याबाबत काही नियम नाहीत. या खात्यात रक्कम ठेवली नाही, तरीही चालू शकेल. मात्र स्वत:च्या खात्यातील पैसे जर खातेधारकाला घरबसल्या काढायचे असतील, तर तो फक्त पाच हजार रुपये काढू शकेल. ते पाच हजार रुपये पोस्टमन त्याला 48 तासांच्या आत घरी आणून देईल. पण जर पाच हजारपेक्षा जास्त रक्कम हवी असेल तर त्या खातेधारकाला संबंधित पोस्ट कार्यालयात जावे लागेल, असे विनोदकुमार यांनी स्पष्ट केले. शनिवारी फोनद्वारे पैसे काढण्याची विनंती नोंदवली असेल, तर मात्र पैसे सोमवारी मिळतील. काही भागात मोबाईल रेंज व अन्य तत्सम तांत्रिक प्रश्न काही प्रमाणात येतील असे ते पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हणाले.देशातील 20 कोटी लोकांकडे अजूनही बँकेत खाती नाहीत, असे आढळून आले आहे. यापैकी 60 टक्के महिला आहेत. किती गोमंतकीयांकडे बँक खाती नाहीत याची माहिती प्राप्त झालेली नाही. राज्यात 400 ग्रामीण पोस्टमन आहेत. पणजीतील 16 व मडगावमधील 11 पोस्टमनकडे सद्या स्मार्ट फोन आहेत व त्यांचा वापर सुरू झाला आहे. उद्यापासून राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांच्या हस्ते गोवा विभागातील सहा पोस्ट शाखांमध्ये पेमेन्ट बँका सुरू होतील. 

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसbankबँकgoaगोवा