शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
4
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
5
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
6
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
7
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
8
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
9
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
10
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
11
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
12
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
13
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
14
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
15
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
16
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
17
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
18
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
19
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
20
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; आतापर्यंत १४ मृत्यू ८० हून अधिक जखमी

२१ हजार रुफ टॉप सोलरद्वारे ६५ मेगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 08:55 IST

पीएम सूर्यघर योजनेचा उच्चस्तरीय बैठकीत घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी उच्चस्तरीय बैठकीत 'पीएम सूर्यघर मुफ्त बिजली' योजनेचा आढावा घेतला. २०२७ पर्यंत २१ हजार रुफ टॉप सोलर सिस्टम बसवून ६५ मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट असून ते पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आवश्यक त्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या.

बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील गरीब तसेच मध्यमवर्गीयांपर्यंत पोहचून या सर्वांना सौर ऊर्जा निर्मितीसाठी प्रोत्साहित केले जाईल. आजपर्यंत ४ हजार ७०० हून अधिक अर्ज मंजूर करण्यात आले व ७.३४ मेगावॅट सौर ऊर्जा निर्माण झाली. लाभार्थीना ४.२८ कोटी रुपये सबसिडी वितरित करण्यात आली आहे.

बैठकीत २५ वर्षे देखभालीसाठी कंत्राटदार नेमण्याच्या प्रक्रियेला गती देणे, सरकारी इमारती, हॉटेल्स, निवासी संकुले तसेच नव्या व जुन्या इमारतींवर मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा निर्माणासाठी लोकांना प्रोत्साहन देणे, विनामूल्य विद्युत योजना मोडीत काढून पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजनेत समाविष्ट करून काही घटकांना रुफ टॉप सोलर सिस्टम सक्तीची करणे आदी महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. स्वच्छ हरित ऊर्जा, शाश्वतता आणि शून्य कार्बन उद्दिष्टांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला.

नवीकरणीय ऊर्जेसाठी सरकारने अर्थसंकल्पात यंदा ६२.१५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. किनारी भागांमध्ये सीएनजी, बायोफ्युअल तसेज अन्य नवीकरणीय ऊर्जा स्रोतांना प्रोत्साहन दिले जाईल. केंद्र सरकार व जिल्हा खनिज निधीतून ६० कोटी रुपये खर्च करुन प्रायोगिक तत्त्वावर मॉडेल सोलर व्हिलेज अर्थात सौर गाव विकसित केला जाईल. संपूर्ण गावाला लागणारी वीज सौर माध्यमातून निर्माण करण्याचा संकल्प आहे.

किसान क्रेडिट कार्ड, हर घर नल से जल, शंभर टक्के साक्षरता आणि इतर अनेक प्रमुख क्षेत्रांमध्ये गोवा चमकला. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले त्यांचा सत्कार केला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 'संकल्प से सिद्धी'सोबत आम्ही विकसित गोवा, विकसित भारत या दृष्टीकोनासाठी आमची वचनबद्धता व्यक्त करतो, असेही ते म्हणाले. बैठकीस नियोजन व सांख्यिकी खात्याचे संचालक व्ही. सक्सेना व इतर अधिकारी उपस्थित होते.

११ हजार लखपती दीदींना सक्षम करणार

केंद्रात मोदी सरकारने अकरा वर्षे पूर्ण केल्याने या काळात झालेला विकास व इतर उपलब्धींसंबंधी जनतेपर्यंत माहिती पोचवण्यासाठी 'संकल्प से सिद्धी' कार्यक्रमाचा आढावा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल बैठकीत घेतला. डबल इंजिन सरकारच्या प्रभावी प्रवासात राज्य सरकारनेही काही उद्दिष्टे निश्चित केली असून मुख्यमंत्र्यांनी काल बैठकीत ११ हजार लखपती दीदींना सक्षम करण्याचे महत्त्वाकांक्षी टार्गेट दिले. विविध स्वावलंबन आणि महिला सक्षमीकरण उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत