शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कदंबा महामंडळाच्या ताफ्यात लवकरच येणार नवीन ६४ बसेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 16:28 IST

कदंब महामंडळाचे सरव्यवस्थापक नारायण नाईक म्हणाले, कदंबा महामंडळाच्या अनेक जुन्या बसेस झाल्या आहेत.

पणजी (नारायण गावस): कदंबा महामंडळातर्फे राज्यात लवकरच ५० डिझेल आणि १४ नवीन इलेक्ट्रिक बसेसे येणार आहेत. या ९ मीटर लांबीच्या इलेक्ट्रिक बसेस हैदराबादहून कदंबा महामडंळानेने मागवलेल्या ९८ बसेसचा एक भाग आहे. या नव्याने येणाऱ्या इलेक्ट्रिक आणि डिझेल बसेस राज्यातील आंतरराज्य मार्गांवर तैनात केल्या जातील. यामुळे निवासी प्रवासी आणि पर्यटकांच्या प्रवासाच्या गरजा पूर्ण करतील.

कदंब महामंडळाचे सरव्यवस्थापक नारायण नाईक म्हणाले, कदंबा महामंडळाच्या अनेक जुन्या बसेस झाल्या आहेत. ज्या १५ वर्षे पेक्षा जास्त झाल्या आहेत. त्या भंगारात काढण्यात येणार आहे. त्याच्या जागी या नव्या इलेक्ट्रिक बसेस घेतल्या जाणार आहे.

जुन्या डिझेल बसेस बदलण्या सोबत महामंडळ सार्वजनिक लोकांच्या मागणीवर दुर्गम भागात, त्यांच्या सेवांचा विस्तार करण्याचा विचार करत आहे. प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि राज्यात बसेसचे जाळे वाढवण्यासाठी आम्ही नवीन मार्गांची योजना करू, असे नाईक म्हणाले.

नाईक म्हणाले, कदंबा महामंडळ गोवा ते मालवण ही बससेवा पुन्हा सुरू करणार आहे. सध्या, कदंबा महामंडळाच्या ताफ्यात ४४९ डिझेल बस आणि ४८ इलेक्ट्रीक बसेसचा समावेश आहे. १४ नवीन इलेक्ट्रिक बस आणि उर्वरित ९८ ईव्ही जोडण्याबरोबरच कदंबाने गोवा ते मालवण ही बस सेवा पुन्हा सुरू केल्याची घोषणा केली आहे. सुरळीत आंतरराज्यीय वाहतुकीसाठी या मार्गाच्या पुनर्स्थापनेमुळे दोन  राज्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फायदा होईल अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :goaगोवा