शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

टेलिकॉम व इलेक्ट्रॉनिक क्षेत्रतील उद्योगांसाठी 6 लाख चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीन आरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 18:28 IST

टेलिकॉम व इलेक्ट्रॉनिक क्षेत्रतील उद्योगांसाठी 6 लाख चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीन पेडणो तालुक्यातील तुयें येथे आरक्षित करण्यात आली आहे.

पणजी: टेलिकॉम व इलेक्ट्रॉनिक क्षेत्रतील उद्योगांसाठी 6 लाख चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीन पेडणो तालुक्यातील तुयें येथे आरक्षित करण्यात आली आहे. त्याविषयीची अधिसूचना गुरुवारी सरकारच्या माहिती तंत्रज्ञान खात्याने जारी केली आहे.

तुयें येथे इलेक्ट्रॉनिक सिटी आणली जाईल, असे ढोल सरकारी यंत्रणांकडून गेली पाच वर्षे वाजविले जात आहेत. तथापि, ती जागा अजून टेलिकॉम व इलेक्ट्रॉनिक क्षेत्रतील उद्योगांसाठी आरक्षित झाली नव्हती. आता अधिसूचना जारी झाल्याने त्या जागेत ग्रामपंचायतीला काही अधिकार राहणार नाहीत. सरकारच्या माहिती तंत्रज्ञान महामंडळाला आता तुयेंतील जमिनीविषयी सर्व अधिकार प्राप्त होत आहेत. एकूण 5 लाख 97 हजार 125 चौरस मीटरच्या त्या जागेत जी बांधकामे उभी राहतील, त्या बांधकामांना परवाने देणो किंवा त्यांच्याकडून कर गोळा करणो, शूल्क जमा करून घेणो असे अधिकार पंचायतीला नसतील. पंचायतीला माहिती तंत्रज्ञान महामंडळ नुकसान भरपाई देणार आहे.

यापूर्वी चिंबल येथील पाच लाख चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा सरकारने आयटी पार्कसाठी आरक्षित करणारी अधिसूचना जारी केली. तुयें येथील जागेत इलेक्ट्रॉनिक क्षेत्रतील उद्योग आणण्याचा सरकारचा विचार कायम आहे की तो रद्द झाला असा संभ्रम लोकांमध्ये निर्माण झाला होता. तथापि, जागेविषयीची अधिसूचना जारी झाल्याने आता तो संभ्रम दूर झाला आहे. माहिती तंत्रज्ञान खात्याचे संचालक डेरिक नेटो यांच्या सहीने ही अधिसूचना जारी झाली आहे. वेगवेगळ्य़ा एकूण 23 सव्रे क्रमांकाच्या जमिनींचा या क्षेत्रफळात समावेश आहे. तसेच लक्ष्मीकांत पार्सेकर मुख्यमंत्रीपदी असताना तुयें येथे सरकारने जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती. ही प्रक्रिया आता खऱ्या अर्थाने पूर्ण झाली आहे.

टॅग्स :goaगोवाbusinessव्यवसाय