शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तिळारी धरणग्रस्तांतील ५५८ जणांचे अनुदान गोवा सरकारकडून जमा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2017 21:57 IST

तिळारी धरणग्रस्तांतील एकूण ५५८ जणांची एकरकमी अनुदान गोवा सरकारकडून धरणग्रस्तांना आतापर्यंत देण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्हाधिका-याकडून गोवा सरकारला सादर करण्यात आलेल्या अंतिम यादीनंतर हे अनुदान देण्यात आले आहे.  

म्हापसा : तिळारी धरणग्रस्तांतील एकूण ५५८ जणांची एकरकमी अनुदान गोवा सरकारकडून धरणग्रस्तांना आतापर्यंत देण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्हाधिका-याकडून गोवा सरकारला सादर करण्यात आलेल्या अंतिम यादीनंतर हे अनुदान देण्यात आले आहे.  

एकूण ६३२ धरग्रस्तांची यादी गोवा सरकारला महाराष्ट्राकडून सुपूर्द करण्यात आली होती. सादर करण्यात आलेल्या अर्जातील एकूण १७ अर्ज परत सिंधुदुर्ग जिल्हाधिका-याला खुलासा करण्यासाठी तसेच त्यात काही त्रुटी असल्याने परत पाठवण्यात आले होते. राहिलेल्या ६१५ अर्जातील धरणग्रस्तांना अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली. त्यातील ५५८ जणांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आले आहे. राहिलेल्या ५७ जणातील ७ जणांचे अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील काही दिवसात ते जमा करण्यात येणार आहे. इतर ५० जणांचे अनुदान पुढील डिसेंबर महिन्यात देऊन एकूण धरणग्रस्तांची यादी निकालात काढली जाणार आहे. राज्य विधानसभेचे हिवाळी अधिवेशन पुढील महिन्यात बोलावण्यात आले असून अधिवेशन संपल्यानंतर पुढील प्रक्रिया संपन्न होण्याची शक्यता आहे. 

तिळारी धरणग्रस्तांना नोकरी ऐवजी ५ लाख रुपयांचे अनुदान देण्याचे महाराष्ट्र तसेच गोवा सरकारात झालेल्या बैठकीत ठरवण्यात आले होते. सुरुवातीला हा आकडा ३ लाख रुपयांचा निश्चित करण्यात आलेला. त्यानुसार सिंधुदुर्गातील जिल्हाधिका-याला यादी तयार करुन नंतर गोवा सरकारच्या जलस्त्रोत खात्याकडे सुपूर्द करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार धरणग्रस्तांची यादी तयार करुन नंतर ती गोवा सरकारला पाठवण्यात आली होती. आलेल्या यादीची योग्य प्रकारे छाननी तसेच पडताळणी केल्यानंतर अनुदान देण्याची प्रक्रिया गोवा सरकारकडून सुरू करण्यात आलेली. 

तिळारी धरण प्रकल्पात गोवा सरकारचा एकूण वाटा ७३.३ टक्के तर महाराष्ट्र सरकारचा वाटा २६.७ टक्के आहे. धरणातील वाट्यानुसार ५ लाखातील गोवा सरकारचा वाटा ३ लाख  ६६ हजार रुपयांचा असून राहिलेले १ लाख ३४ हजार रुपये महाराष्ट्र सरकार देणार आहे. गोवा सरकारकडून देण्यात आलेले अनुदान थेट धरणग्रस्तांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. त्यासाठी धरणग्रस्तांच्या खात्याचा क्रमांक मागवून घेण्यात आलेला. तसेच पॅनकार्ड नंबरही मागवण्यात आलेला. एकूण अनुदानावरील कर वजा करुन नंतर रक्कम खात्यात जमा करण्यात आलेली.  

टॅग्स :goaगोवा