शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकखाली येऊन 54 वर्षीय इसमाचा मृत्यू

By पंकज शेट्ये | Updated: February 22, 2024 22:05 IST

वास्को पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक मयूर सावंत अधिक तपास करीत आहेत.

वास्को: गुरुवारी (दी. 22) रात्री दाबोळी महामार्गावर ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दाबोळी येथे राहणारा 54 वर्षीय शौकत अली शेख याचा जागीच मृत्यू झाला. शौकत दुचाकीने जाताना त्याची समोरून जाणाऱ्या ट्रकला धडक बसल्यानंतर तो ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्यानंतर गंभीर जखमी होऊन मरण पावल्याची माहिती  वास्को पोलिसांकडून मिळाली. 

वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री सातच्या सुमारास तो अपघात घडला. 54 वर्षीय शौकत अली शेख दुचाकीने वेर्णा दिशेने जाण्यासाठी निघाला होता. शौकत दबोळी महामार्गावर पोचला त्यावेळी त्याच्यापुढे असलेला ट्रकही वेर्णाच्या दिशेने जात होता. महामार्गावरील ट्राफिक सिग्नल पडून पुन्हा सुटल्यानंतर शौकत त्याच्या दुचाकीने ट्रकच्या मागून जाताना त्याची धडक ट्रकच्या मागे बसल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. ट्रकला धडक बसल्यानंतर शौकत पडून तो ट्रकच्या मागच्या चाकाखाली आला अशी माहिती प्राप्त झाली.

अपघातात गंभीर जखमी झालेल्या शौकतला तेथे असलेल्या  काही लोकांनी त्वरित चिखली उपजिल्हा इस्पितळात नेला, मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. वास्को पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन अपघाताचा पंचनामा केला. अपघातात मरण पावलेला शौकत पेंटरचे काम करायचा अशी माहिती पोलिसांकडून मिळाली. वास्को पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक मयूर सावंत अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघातgoaगोवा