पणजी : येथील सांता मोनिका जेटीसमोर पार्किंगसाठी उभारण्यात येत असलेल्या बहुमजली इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून येत्या १९ डिसेंबर रोजी गोवा मुक्तिदिनी या इमारतीचे उद्घाटन केले जाईल. ५३० चारचाकी वाहने पार्क करण्याची व्यवस्था या इमारतीत होणार असून पार्किंगची मोठी समस्या असलेल्या राजधानी शहरासाठी हा प्रकल्प दिलासादायक ठरणार आहे. पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी दोन दिवसांपूर्वी या इमारतीची अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. या तीन मजली इमारतीच्या बांधकामावर २३ कोटी ५० लाख रुपये खर्च झालेला असून विजेसाठी वायरिंग आणि रंगरंगोटीचे तेवढे काम बाकी आहे. कार, जीपगाड्या आदी चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठीच ही इमारत वापरात आणली जाईल. तीन मजल्यांवर (पान २ वर)
५३० चारचाकींसाठी बहुमजली पार्किंग
By admin | Updated: November 24, 2014 01:29 IST