शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पाच वर्षात पन्नास हजार नोकऱ्या, आपचा युवा जाहिरनामा प्रकाशित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2017 20:27 IST

आम आदमी पक्ष सत्तेवर आल्यास अनेक उद्योगधंदे गोव्यात आणू व पाच वर्षात पन्नास हजार नोक:या युवकांसाठी निर्माण करू, अशी ग्वाही आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार एल्वीस गोम्स

ऑनलाइन लोकमत पणजी, दि. 2 - आम आदमी पक्ष सत्तेवर आल्यास अनेक उद्योगधंदे गोव्यात आणू व पाच वर्षात पन्नास हजार नोक:या युवकांसाठी निर्माण करू, अशी ग्वाही आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार एल्वीस गोम्स यांनी सोमवारी येथे दिली. त्यांनी आपचा युवा जाहिरनामा प्रकाशित केला.अ‍ॅड. सुरेल तिळवे, सिसिल रॉड्रीग्ज, वाल्मिकी नायक आदींच्या उपस्थितीत गोम्स यांनी पत्रकार परिषद घेतली. आम्ही उद्योगांसाठी एक खिडकी योजना राबवू व लगेच त्यांना परवानगी देऊ. उद्योगांना कर सवलतही दिली जाईल. स्थानिकांना रोजगार संधी मिळावी म्हणून उद्योग उभा राहण्यापूर्वीच मनुष्यबळ प्रशिक्षित करण्याची अट लागू केली जाईल. हॉस्पिटेलिटी, माहिती तंत्रज्ञान, अन्न प्रक्रिया, कृषी, बायोफार्मास्युटिकल, करमणूक आदी क्षेत्रंमध्ये आम्ही उद्योग-धंद्यांना प्रोत्साहन देऊ, असे गोम्स यांनी सांगितले.दोन नव्या स्टार्ट अप इनक्युबेशन सेंटरची स्थापना केली जाईल. स्वयंरोजगार योजनेखाली एका साध्या अर्जानंतर युवकांना व्यवसाय-धंदा सुरू करण्यासाठी 5क् लाखांचा पतपुरवठा केला जाईल. सरकार त्यासाठी हमीदार राहील. सरकारी विद्यालयांच्या साधनसुविधा वाढविल्या जातील. शिक्षकांना बिगशैक्षणिक कामांपासून म्हणजे निवडणूकविषयक व अन्य तत्सम कामांपासून मुक्त केले जाईल. महाविद्यालयांमध्ये व विद्यापीठांमध्ये मोफत वायफाय सुविधा पुरविल्या जातील, असेही गोम्स यांनी युवा जाहिरनाम्याद्वारे स्पष्ट केले. देशात जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेतील त्यांना पंधरा लाखांचे व्याजमुक्त कर्ज आणि विदेशात शिक्षणासाठी पंचवीस लाखांचे कर्ज दिले जाईल, महाविद्यालयांना सांस्कृतिक व क्रिडाविषयक सोहळे आयोजित करण्यासाठी प्रत्येकी दोन लाख रुपयांचे अर्थसाह्य विद्यार्थी मंडळाकडे सोपविले जाईल. यामुळे विद्याथ्र्याना कुठच्याच राजकारण्यांकडे देणगी मागावी लागणार नाही, असे गोम्स म्हणाले.क्रिडा क्षेत्रकडे सरकारने कधीच गंभीरपणो लक्ष दिले नाही. यामुळे अत्युच्च दर्जाचे क्रिडापटू निर्माण होण्यात अडचण येते. आम्ही राज्यात क्रिडा विद्यापीठ उभे करू. राज्यातील अनेक गावांमध्ये ज्या मोकळ्य़ा जागांमध्ये मुले खेळतात, अशा जागा सरकार प्रकल्पांसाठी ताब्यात घेते व मुलांवर अन्याय करते. आपण क्रिडा मैदान बांधणार असे सरकार जाहीर करून केवळ पायाभरणी करते व ते मैदान कायम स्वत:च्या ताब्यात ठेवते. आम्ही अशी साडेतीनशे मैदाने मुलांसाठी खेळण्यास मोकळी करू. तसेच सत्तेवर येताच क्रिडा खात्यासाठी अर्थसंकल्पीय तरतुद दुप्पट करू, असे गोम्स यांनी सांगितले. बारा रविंद्र भवने बांधली जातील. शिवाय नाटक, तियात्र अशा उपक्रमांसाठी एकूण चाळीस मांड लोकांसाठी उपलब्ध केले जातील, असे गोम्स यांनी सांगितले.(खास प्रतिनिधी)