मडगाव : खड्डे-बार्से येथे आय टेन कार व मासेवाहू कंटेनर यांच्यात अपघात होऊन कारमधील पाच जण जखमी झाले. यातील तिघेजण गंभीर जखमी असून, त्यांना गोमेकॉत उपचारासाठी दाखल केले आहे. तर अन्य दोघांवर हॉस्पिसिओत उपचार चालू आहेत. अपघातात जखमी झालेल्यांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. अपघातामुळे या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काहीवेळ खोंळबून राहिली. मागाहून कुंकळ्ळी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक सुरळीत केली. आयटेन कार मडगावहून कारवारच्या दिशेने जात होती, तर कंटेनर विरुध्द दिशेने येत होता. या अपघातातील इरफान सय्यद (३५), नफिझा सय्यद (३८), झरिना सय्यद (५५) या तिघांवर गोमेकॉत उपचार सुरू असून, हॉस्पिसिओत दाखल केलेल्यांची नावे नझद सय्यद (१0) व जिदान सय्यद (९) अशी आहेत. अपघातानंतर कंटेनरचालकाने घटनास्थळाहून पळ काढला. कुंकळ्ळी पोलीस तपास करत आहेत.
बार्से येथे अपघातात ५ जखमी; तिघे गंभीर
By admin | Updated: October 26, 2015 03:03 IST