शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

Fuel Price: पेट्रोल- डिझेल विक्रीतून गोव्याला 5 कोटींचा अतिरिक्त महसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 19:10 IST

Fuel Price Hike: पेट्रोल व डिझेलचे दर वाढत गेल्यामुळे या दोन्ही इंधनांच्या विक्रीतून गोव्याला साधारणत: पाच कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल प्राप्त झालेला आहे.

पणजी : पेट्रोल व डिझेलचे दर वाढत गेल्यामुळे या दोन्ही इंधनांच्या विक्रीतून गोव्याला साधारणत: पाच कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल प्राप्त झालेला आहे. पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धीत कर (व्हॅट) कमी करण्याविषयीची सूचना अजून गोवा सरकारकडून येथील वाणिज्य कर खात्याला आलेली नाही.

गोवा सरकारला पेट्रोल व डिझेलच्या विक्रीतून दरमहा सरासरी 80 ते 100 कोटी रुपयांचा मूल्यवर्धीत कर प्राप्त होतो. वार्षिक सुमारे 1 हजार 100 कोटी रुपयांचा महसूल सरकारला मिळत असतो. गेले वर्षभर वारंवार पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाल्यामुळे साधारणत: 5 कोटी रुपयांची महसूलात वाढ झालेली आहे. वाणिज्य कर आयुक्त श्री. बांदेकर म्हणाले, की गोव्यातील पेट्रोल व डिझेलवरील व्हॅट हा देशात सर्वात कमी आहे. अंदमाननंतर गोव्यात पेट्रोल व डिझेल हे सर्वात कमी दराने विकले जाते. जी थोडी वाढ दरांमध्ये अलिकडे झाली त्यामुळे साधारणत: 4-5 कोटींचा अतिरिक्त महसूल सरकारी तिजोरीत आलेला असेल.

पेट्रोलवर सध्या 17 टक्के व्हॅट आहे. पूर्वी हे प्रमाण 15 टक्के होते. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात 17 टक्के प्रमाण केले गेले व त्यामुळे पेट्रोल 64 रुपये लिटर झाले होते. आता पेट्रोल साधारणत: 77 रुपये 33पैसे प्रतिलिटर दराने गोव्यात विकले जात आहे. वर्षभरात 13-14  रुपयांनी पेट्रोल महागले आहे. तरीही देशातील अन्य भागांप्रमाणो हे प्रमाण गोव्यात कमीच आहे. गोव्यात डिझेलवर 19 टक्के व्हॅट आकारला जातो. 2012 साली राज्यात मनोहर र्पीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकार अधिकारावर आल्यानंतर पेट्रोलवरील व्हॅट जवळजवळ काढून टाकला गेला होता. नंतरच्या कालावधीत तो हळूहळू वाढवत नेला गेला. 

टॅग्स :Fuel Hikeइंधन दरवाढPetrol Pumpपेट्रोल पंप