शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

दाबोळी विमानतळावर उतरलेल्या प्रवाशाकडून ४८ लाख ४७ हजारांचे तस्करीचे सोने जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 19:45 IST

गोव्याच्या दाबोळी विमानतळावरून मंगळवारी (दि.२१) कस्टम अधिकाऱ्यांनी विदेशातून आलेल्या एका पुरुष प्रवाशाकडून पेस्ट पद्धतीने आणलेले १ किलो ६३० ग्राम तस्करीचे सोने जप्त केले.

वास्को: गोव्याच्या दाबोळी विमानतळावरून मंगळवारी (दि.२१) कस्टम अधिकाऱ्यांनी विदेशातून आलेल्या एका पुरुष प्रवाशाकडून पेस्ट पद्धतीने आणलेले १ किलो ६३० ग्राम तस्करीचे सोने जप्त केले. जप्त केलेले तस्करीचे सोने ४८ लाख ४७ हजार ७३४ रुपयांचे असून, कस्टम अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकून ते विमानतळाबाहेर नेण्यासाठी त्याने ते कमरेवर बांधलेल्या बेल्ट तसेच पायातील बुटात लपवून आणल्याचे तपासणीवेळी कस्टम अधिका-यांच्या समोर उघडकीस आले.दाबोळी विमानतळावरील कस्टम अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी सदर कारवाई करण्यात आली. मस्कत राष्ट्रातून दाबोळी विमानतळावर येणार असलेल्या ‘एअर ओमान’ विमानातून एक प्रवासी तस्करीचे सोने घेऊन येत असल्याची पूर्व माहिती कस्टम अधिका-यांना मिळताच त्यांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. विमान येथे पोचल्यानंतर प्रवाशांची तपासणी करण्यास सुरुवात केली असता कस्टम अधिका-यांना एका प्रवाशाच्या हालचालीवरून संशय आल्याने त्याला बाजूला घेऊन त्याची कसून तपासणी करण्यात आली. तपासणीत कस्टम अधिका-यांना त्या प्रवाशाने आपल्या कमरेत घातलेल्या बेल्टमध्ये तसेच पायातील बूटमध्ये पेस्ट पद्धतीने सोने लपवून आणल्याचे स्पष्ट होताच सदर सोने प्रथम ताब्यात घेण्यात आले.ह्या सोन्याचे वजन केले असता ते १ किलो ६३० ग्राम असल्याचे स्पष्ट झाले. मंगळवारी कारवाई करून जप्त केलेले सदर सोने ४८ लाख ४७ हजार ७३४ रुपयांचे असल्याची माहिती कस्टम अधिका-यांनी दिली. त्या प्रवाशाने सदर तस्करीचे सोने कुठून आणले होते व येथून ते कुठे नेण्यात येणार होते याबाबत कस्टम अधिकारी तपासणी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाचे सहाय्यक कमिश्नर एन. जी. पटेल, सहायक कमिश्नर दीपक गवई यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली. सदर प्रकरणाचा अधिक तपास चालू आहे.दीड महिन्यात दाबोळी विमानतळावर ६० लाख ५८ हजारांचे तस्करीचे सोने जप्त१ एप्रिल २०१९ पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर अजूनपर्यंत दाबोळी विमानतळावरील कस्टम अधिका-यांनी ६० लाख ५८ हजार रुपयांचे तस्करीचे सोने जप्त केले असल्याची माहिती विभागाच्या अधिका-यांनी उघड केली. मंगळवारी (दि.२१) कस्टम विभागाने केलेल्या तस्करीच्या सोन्या विरुद्धची कारवाई दाबोळी विमानतळावरील ह्या आर्थिक वर्षातील अजूनपर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे सूत्रांनी कळविले.