गोमेकॉत कॅन्सर रूग्णाला दिले ४.२० लाखांचे पहिले मोफत इंजक्शन 

By वासुदेव.पागी | Published: February 4, 2024 04:04 PM2024-02-04T16:04:02+5:302024-02-04T16:04:43+5:30

गोव्यात​ ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे. त्यामुळेच आरोग्य खात्याने गेल्या काही वर्षांत एक लाखांपेक्षा अधिक महिलांची याबाबत तपासणी​ केलेली आहे.

4.20 lakh first free injection given to Gomeco cancer patient | गोमेकॉत कॅन्सर रूग्णाला दिले ४.२० लाखांचे पहिले मोफत इंजक्शन 

गोमेकॉत कॅन्सर रूग्णाला दिले ४.२० लाखांचे पहिले मोफत इंजक्शन 

पणजी : स्तनाच्या कॅन्सरच्या रुग्णांना मोठा दिलासा देणारा निर्णय गोवा वैद्यकीय महाविद्यालयाने घेतला असून या रोगावर प्रभावी ठरणारे ४.२० लाख रुपये किंमतीचे इंजेक्शन मोफत देण्यास सुरूवात केली आहे. अशा प्रकारच्या रूग्णाला गोमेकॉत पहिले इंजक्शन रविवारी देण्यात आले आहे.

अशा प्रकारचे महागडे इंजेक्शन मोफत देणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली आहे. जागतिक कॅन्सर दिनानिमित्त रविवारी या इंजेक्शनचा पहिला लाभ देण्यात आला. 

गोव्यात​ ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे. त्यामुळेच आरोग्य खात्याने गेल्या काही वर्षांत एक लाखांपेक्षा अधिक महिलांची याबाबत तपासणी​ केलेली आहे. पुढील वर्षभरात आणखी दीड लाख महिलांची तपासणी करण्याचा संकल्प सरकारने केला आहे.  महिलांना आरोग्यासंदर्भात आधार आणि मदत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने वि​विध योजना आखलेल्या आहेत. लाखो महिला त्याचा लाभ घेत आहेत. ब्रेस्ट कॅन्सरने ग्रस्त असलेल्या गोव्यातील महिलांसाठी हा निर्णय मोठा देणारा ठरला आहे. कारण डइतके महागडे उपचार सर्वसामान्य कुटुंबातील महिला घेऊ शकत नाहीत. या शिवाय अशा अनेक सुविधा गोव्यातील जनतेसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण करणार असल्याचे राणे यांनी सांगितले. 

दरम्यान, गोव्यातील स्वतंत्र कॅन्सर हॉस्पिटलची उभारणीचे काम गतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.  पुढील १६ महिन्यांत ते पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: 4.20 lakh first free injection given to Gomeco cancer patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.